Sambhaji Bhide : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांचा अपमान आम्हाला अजिबात सहन होणार नसल्याचा इशाराच भाजपचे जिल्हाध्य़क्ष, खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी दिली आहे. दरम्यान, अमरावतीत संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं. त्यानंतर राज्यभरातून विरोधकांकडून भिडेंच्या विधानाचा निषेध करण्यात आला. त्यातच आता काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनीही भिडेंवर टीकेची तोफ डागली होती.
Sangli News : संभाजी भिडेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक; तर काँग्रेसनेही सांगितली निषेधाची तारीख
खासदार बोंडे म्हणाले, समाजवादीचे आमदार अबू आझमी भारत माता की जय म्हणणार असं जाहीरपणे बोलत आहेत, नवाब मलिक कोण आहेत हे सर्वांना माहित आहे, या दोन्ही नेत्यांबद्दल आमदार यशोमती ठाकूर यांचं तोंड बंद असतं. मात्र ठाकूर भिडे गुरुजींचा अपमान करीत आहेत. भिडे गुरुजींचा अपमान आम्हाला अजिबातच सहन होणार नसल्याचं बोंडे म्हणाले आहेत.
तसेच पुढे बोलताना ते म्हणाले, भिडे गुरुजींचा भाजपशी कुठलाही संबंध नाही, मात्र एक हिंदू व्यक्ती म्हणून मी त्यांच्या पाठीशी असल्याचे अनिल बोंडे म्हणाले आहेत. तसेच यशोमती ठाकूर यांना भिडे गुरुजींवर बोलण्याचा कुठलाही अधिकार नसून त्यांच्याविरोधातही गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी अनिल बोंडे यांनी केली आहे.
सुरक्षेत मोठी चूक; राज्यपालांच्या ताफ्यावर कारची धडक, दोघांना अटक
ठाकूर काय म्हणाल्या?
संभाजी भिडे यांनी महात्मा गांधींबद्दल जे विधान केलं त्याचा निषेध. संभाजी भिडे यांना देशाबद्दल काही वाटतं की नाही? काहीही बेताल वक्तव्य करायचं आणि युवकांची माथी भडकवायची हे संभाजी भिडे यांचं षडयंत्र आहे. संभाजी भिडे जिथे राहतात तिथले लोकं म्हणतात की, संभाजी भिडे हे अफजल खान यांचे वकील श्रीकृष्ण कुलकर्णी यांचे वंशज आहेत. संभाजी भिडे यांना अटक केली पाहिजे. 15 ऑगस्टला तेढ निर्माण झाला तर त्याला जबाबदार सरकार असेल असं ठाकूर म्हणाल्या आहेत. तसेच भिडे गुरुजींना हरामखोर, नालायक असेही म्हटल्याचा आरोप अनिल बोंडे यांनी केला आहे.
दरम्यान, संभाजी भिडे हे याआधीही अनेकदा वादग्रस्त विधाने करुन चर्चेत आलेले आहेत. आता त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याने चांगलेच अडचणीत सापडले आहेत. राज्यातील अनेक भागांत त्यांचा निषेध तर काही ठिकाणी त्यांना समर्थन देण्यात येत आहेत. काँग्रेस नेत्यांनी विधानसभेत केलेल्या मागणीनंतर आता त्यांच्यावर अमरावतीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.