Download App

यवतमाळ-वाशिममध्ये संजय देशमुखांची विजयाकडे वाटचाल, राजश्री पाटील 36, 763 मतांनी पिछाडीवर

संजय देशमुख यांनी आतापर्यंत 2 लाख 19 हजार 253 मते मिळाली असून त्यांनी 36 हजार 763 मतांना आघाडी घेतली.

Yavmatal-Washim Loksabha Result 2024 : राज्यात ज्या लक्षवेधी लढती होत आहेत. त्यापैकीवतमाळ-वाशि (Yavmatal-Washim) हा एक मतदारसंघ आहे. यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीला आज सकाळी सुरुवात झाली. महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख (Sanjay Deshmukh) यांना पहिल्या फेरीपासूनच मतांची आघाडी घेतली आहे. संजय देशमुख यांनी आतापर्यंत 2 लाख 19 हजार 253 मते मिळाली असून त्यांनी 36 हजार 763 मतांनी आघाडी घेतली. त्यामुळे महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.

Loksabha Result 2024 : पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा डंका…आत्तापर्यंतचा निकाल काय सांगतो? वाचा… 

राज्यातील चंद्रपूर, अकोला, वर्धा या सगळ्या जागांवर महाविकास आघाडी महायुतीच्या पुढे गेल्याचे चित्र आहे. यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघातही शिवसेनेचे उमेदवार संजय देशमुख यांनी चांगलीच मुसंडी मारली आहे. निवडणुकीनंतर एक्झिट पोलमध्ये यवतमाळ-वाशीममधून संजय देशमुख विजयी होतील, असा अंदाज वर्तवला होता. तेच चित्र सध्या पाहायला मिळत आहे. संजय देशमुख यांनी आतापर्यंत 2 लाख 19 हजार 253 मते मिळाली असून त्यांनी 36 हजार 763 मतांनी आघाडी घेतली. तर शिंदे गटाच्या उमेदवार राजश्री पाटील यांना आतापर्यंत 1 लाख 82 हजार 490 मते मिळाली असून त्या 36 हजार 763 मतांनी पिछाडीवर आहेत.

Lok Sabha Election Results: सिंधुदुर्गमध्ये नारायण राणे 12 हजार मतांनी पुढे, विनायक राऊतांची पिछाडी कायम 

वंचित बहुजन आघाडीने पाठींबा दिलेले समनक पार्टीचे उमेदवार अनिल राठोड हे तिसऱ्या स्थानावर आहेत. त्यांना आतापर्यंत 23 हजार 920 मते मिळाली आहेत. तर बसपाकडून रिंगणात असलेल माजी खासदार हरिभाऊ राठोड हे चौथ्या स्थानावर आहेत. हरिभाऊ राठोड यांना आतापर्यंत 6 हजार 748 मते मिळाली आहेत.

वाशिम-यवतमाळमध्ये एकूण 17 उमेदवार रिंगणात होते. मात्र लढत सरळ शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी होती.

Elections Results : विदर्भाचा कौल! चंद्रपूर, अमरावती, अकोल्यात कोणाची आघाडी? 

कोण आहेत संजय देशमुख?

संजय देशमुख यांनी 1998 मध्ये शिवसेनेतून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. 1999 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी बंडखोरी केली. ते अपक्ष आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर 2004 मध्ये ते पुन्हा एकदा दिग्रस मतदारसंघातून अपक्ष आमदार म्हणून विजयी झाले. पण, 2009 मध्ये दारव्हा मतदारसंघाचे तत्कालीन आमदार संजय राठोड यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता.

दरम्यान, पहिल्या फेरीपासून महाविकास आघाडीचे संजय देशमुख आघाडीवर आहेत, त्यामुळे आता मतमोजणी केंद्रावर महाविकास आघाडीच्या समर्थकांची गर्दी वाढत आहे. शहरातील अनेक ठिकाणी आणि सार्वजनिक ठिकाणी नागरिक टीव्हीवर निकाल पाहत असल्याचे चित्र आहे. पोलिसांनी मतदान केंद्रावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.

follow us

वेब स्टोरीज