विधान परिषदेच्या 17 पैकी 11 जागांसाठी आज मतदान; महायुती-मविआचे कोणते उमेदवार भिडणार?

Legislative Council Elections स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ विधान परिषद निवडणुकीसाठी आज 18 जून 2026 रोजी मतदान प्रकिया पार पडणार आहे.

Legislative Councils

Legislative Councils

Voting for 11 out of 17 Legislative Council seats which candidates of Mahayuti and MVA will face off : राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ विधान परिषद निवडणुकीसाठी आज 18 जून 2026 रोजी मतदान प्रकिया पार पडणार आहे. त्यामध्ये 17 पैकी 6 जागा बिनविरोध तर 11 ठिकाणी महायुती-मविआमध्ये लढत होणार आहे. त्यामुळे कोणत्या जागांवर ही लढत कुणामध्ये होणार? तसेच कोणत्या जागा बिनविरोध झाल्या आहेत जाणून घ्या सविस्तर…

11 ठिकाणी महायुती-मविआमध्ये लढत…

छत्रपती संभाजीनगर-जालना, जळगाव, धाराशिव-लातूर-बीड, परभणी-हिंगोली, अमरावती, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली, भंडारा-गोंदिया, नांदेड, सोलापूर, नागपूर, सांगली-सातारा, नाशिक या ठिकाणी महायुती-मविआमध्ये लढत होणार आहे. या 11 जागांवरलढत कुणामध्ये होणार? तर यामध्ये…

सोलापूर मतदारसंघात भाजपचे राजेंद्र राऊत यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे वसंतराव देशमुख यांचे आव्हान आहे.

जळगाव येथे तिरंगी लढत रंगणार असून भाजपचे नंदकिशोर महाजन, ठाकरे गटाचे शरद तायडे आणि अपक्ष म्हणून मैदानात उतरलेल्या रेश्मा काळे यांच्यात सामना होईल.

सांगली-सातारा मतदारसंघात भाजपचे धैर्यशील कदम, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे अभयसिंह जगताप आणि अपक्ष किशोर धुमाळ यांच्यात चुरस अपेक्षित आहे.

नांदेडमध्ये भाजपचे अमर राजूरकर आणि काँग्रेसचे रामदास पाटील आमनेसामने आहेत.

नागपूर पोटनिवडणुकीत भाजपचे डॉ. राजीव पोतदार यांच्याविरोधात काँग्रेसचे अतुल लोंढे मैदानात आहेत.

भंडारा-गोंदिया मतदारसंघात काँग्रेस समर्थित नरेश ईश्वरकर आणि भाजपचे अविनाश ब्राह्मणकर यांच्यात थेट लढत होणार आहे.

नाशिकमध्ये अपक्ष गोकुळ गीते आणि शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांच्यात सामना रंगणार आहे.

अमरावतीमध्ये काँग्रेसचे हर्षदीप देशमुख, भाजपचे प्रवीण पोटे आणि वंचित बहुजन आघाडीचे निलेश विश्वकर्मा यांच्यात तिरंगी स्पर्धा आहे.

धाराशिव-लातूर-बीड मतदारसंघात भाजपचे बसवराज पाटील आणि काँग्रेसचे महेश देशमुख यांच्यात मुकाबला होणार आहे.

परभणी-हिंगोली येथे शिवसेनेचे सईद खान, ठाकरे गटाचे डॉ. विवेक नावंदर आणि अपक्ष सुशील देशमुख यांच्यात लढत होईल.

छत्रपती संभाजीनगर-जालना मतदारसंघात भाजपचे सुहास शिरसाट आणि ठाकरे गटाचे गणेश लोखंडे यांच्यात थेट सामना होणार असून या लढतीकडे विशेष लक्ष लागले आहे.

या निवडणुकीतील निकालांमुळे अनेक जिल्ह्यांतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असल्याने सर्वच पक्षांनी प्रचारासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे.

कोण-कोणत्या जागा झाल्या बिनविरोध?

ठाण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार रविंद्र फटक यांच्या विरोधात उभे असलेले राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे उमेदवार आणि नगरसेवक असलेले अभिजित पवार यांनी माघार घेतली आहे. त्यामुळे फाटक यांची निवडणूक बिनविरोध झाली. यवतमाळमध्ये देखील असंच घडलं आहे. याठिकाणी काँग्रेसचे उमेदवारासह तीन अपक्षांनी माघार घेतल्याने यवतमाळमध्ये देखील शिवसेनेचे उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी यांची निवडणूक बिनविरोध झाली.

लव जिहाद! ‘त्या’ नराधमचे कुटुंब या ठिकाणी दिसायला नको… आमदार जगताप संतापले

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांचे उमेदवार आणि पुणे शहराध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे महायुतीचे उमेदवार विक्रम काकडे यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला. रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग विधानपरिषद मतदारसंघातून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आणि शिवसेना (ठाकरे गट) नेते सुरेंद्र उर्फ बाळ माने यांनी अचानक आपली उमेदवारी मागे घेतली. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे यांची निवडणूक बिनविरोध झाली.

‘ऑपरेशन टायगर’ संभ्रम कायम; 19 जून नाही आता ‘या’ दिवशी होणार विलिनीकरणाची घोषणा

अहिल्यानगर विधानपरिषदेच्या निवडणुकीतून अपक्ष उमेदवार करण ससाणे, कमलेश गांधी आणि दत्ता पानसरे यांनी माघार घेतली. त्यामुळे भाजपचे प्राजक्त तनपुरे यांची बिनविरोध निवड झाली. तर तिकडे वर्धा-गडचिरोली-चंद्रपूरमध्ये सुप्रिया सुळेंचे व्याही आणि भाजपचे उमेदवार अरूण लखाणी यांची बिनविरोध निवड झाली.

Exit mobile version