Weather Update : राज्यावर पुन्हा अवकाळीचं संकट, पुढील तीन दिवस पावसाची शक्यता

Weather Update : देशासह राज्यावर पुन्हा एकदा अवकाळीच संकट (Weather Update ) येण्याची शक्यता आहे पुढील 48 तासांत देशातील हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये बांगलादेशवर (Bangladesh) 3.1 किलोमीटर पर्यंत चक्रीवादळाचे क्षेत्र पसरल्याने पावसासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांची रब्बी हंगामातील पीक पुन्हा धोक्यात आली आहेत. Ram Mandir प्राणप्रतिष्ठा सोहळा अवघ्या काही […]

Maharashtra Weather Update : राज्यावर अवकाळीचं संकट कायम; आजही काही जिल्ह्यांना हवामान विभागाची यलो अलर्ट!

Maharashtra Weather Update

Weather Update : देशासह राज्यावर पुन्हा एकदा अवकाळीच संकट (Weather Update ) येण्याची शक्यता आहे पुढील 48 तासांत देशातील हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये बांगलादेशवर (Bangladesh) 3.1 किलोमीटर पर्यंत चक्रीवादळाचे क्षेत्र पसरल्याने पावसासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांची रब्बी हंगामातील पीक पुन्हा धोक्यात आली आहेत.

Ram Mandir प्राणप्रतिष्ठा सोहळा अवघ्या काही तासांवर; अयोध्येसह संपूर्ण देशात भक्तिमय वातावरण

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार देशासह राज्यातील काही भागात पावसाची शक्यता वर्तनात आली आहे. यामध्ये पूर्व विदर्भात 22 जानेवारी नंतर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट येण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रातही पाऊस हजेरी लावणार असल्याचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे 22, 23 आणि 24 म्हणजे पुढील तीन दिवस विदर्भासह राज्यातील काही भागात पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे.

Horoscope Today : तूळ, वृश्चिक, धनु राशींसाठी आजचा दिवस खास! आजचे राशीभविष्य जाणून घ्या

हवामान विभागाच्या माहितीनुसार पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात काही दिवसात पाऊस होईल, अशी शक्यता आहे. राज्यात अनेक जिल्ह्यांत गारठ्यात वाढ झाली आहे. पुढील काही दिवस थंडीची लाट कायम राहणार आहे अशी परिस्थिती असताना पावसाचा तडाखाही बसणार आहे.

गुजरातमध्ये रामाच्या मिरवणुकीवर दगडफेक, प्राणप्रतिष्ठेपूर्वी तणाव वाढला

तर दुसरीकडे उत्तर भारतातील अनेक जिल्ह्यांमध्ये धुकं आणि थंडीमुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. यामध्ये दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार या राज्यातील जिल्ह्यांचा समावेश आहे. मात्र देशामध्ये झालेल्या वातावरण बदलामुळे येते काही दिवस तरी उत्तर भारताला कडाक्याच्या थंडीपासून दिलासा मिळणार नसल्याचं हवामान विभागाने सांगितलं आहे.

Exit mobile version