उन्हाळ्यात पाऊस धारा! राज्यात पुढील चार दिवस अवकाळीचे; ‘या’ भागात अलर्ट जारी

राज्यात आजही काही ठिकाणी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पुढील चार दिवस राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.

Maharashtra Rain

Maharashtra Rain

Weather Update : राज्यात मे महिन्यातील कडाक्याच्या उन्हाने महाराष्ट्र पोळून निघाला (Weather Update) आहे. राज्यात अनेक ठिकाणी तापमान चाळीशीच्या पुढे गेले आहे. त्यामुळे नागरिक हैराण झालेले असतानाच दिलासा देणारी बातमी आली आहे. पूर्व विदर्भात वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. काही भागात गारपीटही झाली आहे. त्यानंतर राज्यात आजही काही ठिकाणी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पुढील चार दिवस राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.

पूर्व विदर्भात काल अवकाळी पावसासह जोरदार गारपीटने अनेक भागात हजेरी लावली. त्यामुळे उन्हाच्या तडाख्याने होरपळणाऱ्या विदर्भातील तापमानात घट झाली. मात्र हा अवकाळी पाऊस शेतातील पिकांसाठी नुकसानदायक ठरणार आहे. काही ठिकाणी फळबागांचे नुकसानही झाले आहे. हा पाऊस शेती पिकांसाठी मात्र चांगलाच नुकसान करणारा ठरला आहे.

Weather Update : कुठे उष्णतेची लाट तर कुठे वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता; वातावरणात मोठा बदल

विदर्भातील जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याचा अंदाज आहे. तसेच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल अशी शक्यता आहे. आयएमडीने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, विदर्भात मराठवाड्यात 12 मे पर्यंत पाऊस होईल. विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा तसेच मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यांत काही ठिकाणी विजांचा कडकडाट वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे. लातूर आणि हिंगोली जिल्ह्यातही अवकाळी पाऊस होईल अशी शक्यता आहे.

हा पाऊस अवकाळी असल्याने शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. पावसाचा फटका पिकांना बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मुंबई आणि पुण्यात पाऊस होईल अशी शक्यता नाही. जानेवारी महिन्यात दक्षिण तामिळनाडू, दक्षिण केरळ, लक्षद्वीपसह दक्षिण भारतात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला होता. त्यानंतर बरेच दिवस पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र दोन ते तीन दिवसांपासून महाराष्ट्रासह अनेक राज्यांत पाऊस पुन्हा सुरू झाला आहे. हा पाऊस असाच सुरू राहिला तर उन्हाळी पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

Weather Update : आज राज्याच्या ‘या’ भागात अवकाळीची शक्यता तर विदर्भाला ऑरेंज अलर्ट जारी

 

Exit mobile version