Download App

सावधान! आज ‘या’ जिल्ह्यांत जोरदार बरसणार; हवामान विभागाचा अलर्ट जारी

पालघर आणि ठाणे वगळता राज्यात सर्वदूर पाऊस होईल अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

Image Credit: Letsupp

Monsoon in Maharashtra : राज्यात मान्सूनची दमदार वाटचाल सुरू असून अनेक भागात (Monsoon in Maharashtra) पाऊस पडत आहे. दिवसा तापमानात वाढ झाल्याचे दिसते सायंकाळी मात्र पाऊस हजेरी लावतो. असे चित्र मागील चार ते पाच दिवसांपासून दिसत आहे. यावर्षी मान्सून वेळेआधीच (Weather Update) महाराष्ट्रात दाखल झाला. आता पुढील काही दिवसात राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. पालघर आणि ठाणे वगळता राज्यात सर्वदूर पाऊस होईल अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. कोकण, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात आज पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

Monsoon संपत आलाय! यंदा 94.4% पावसाची नोंद; एल निनोचा फारसा प्रभाव नाही

राज्यात मान्सूनचा वेग काहीसा मंदावला आहे. अरबी समुद्रातील (Mumbai Rain) वाऱ्यांचा वेग कमी झाल्याने असे होत आहे. आता मान्सून 20 जूननंतर पूर्णपणे सक्रिय होईल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. आज राज्यात पावसाचा फारसा जोर दिसणार नाही. मात्र काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पाऊस हजेरी लावील अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

मुंबई, पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, सातारा, सांगली. कोल्हापूर या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह (Pune Rain) जोरदार पाऊस होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच येत्या 24 तासांत नंदूरबार, धुळे, नाशिक, जळगाव, नगर आणि पुणे या जिल्ह्यांत पावसाचा जोर वाढेल असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, नगर शहरात रोज सायंकाळच्या वेळेला पाऊस होतो. मात्र हा पाऊस हलक्या ते मध्यम स्वरुपाचा असतो.

सिक्कीममध्ये पावसाचा हाहाकार, ढगफुटीमुळे 6 जणांचा मृत्यू तर 1200 पर्यटक अडकले

यंदा मान्सून वेळेआधीच केरळमध्ये दाखल झाले आहे. यामुळे राज्यात जोरदार वाऱ्यांसह पावसाला सुरुवात झाली आहे. काही दिवसांपूर्वी रेमल चक्रीवादळाने धडक दिली होती. त्याचा परिणाम म्हणून मान्सूनचा वेग वाढला होता. मान्सून वेगाने बंगालच्या खाडीकडे पोहोचला. याच कारणामुळे मान्सून आता वेगाने पूर्वोत्तर राज्यांकडे मार्गक्रमण करू लागला आहे. रेमल वादळामुळे पश्चिम बंगाल, ओडिशासह पूर्वोत्तर भारतातील राज्यांत जोरदार पाऊस पडला होता.

दरम्यान, सिक्कीममध्ये (Sikkim) पावसाने हाहाकार उडाला आहे. सिक्कीममधील मंगन जिल्ह्यात बुधवारी रात्री ढगफुटीमुळे (Sikkim Cloudburst) मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ढगफुटीमुळे या भागात 220.1 मिमी पेक्षा जास्त पाऊस पडला. या ढगफुटीमुळे या भागात 15 विदेशी पर्यटकही तिथे अडकले असून आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती सिक्कीम सरकारने दिली होती.

follow us

वेब स्टोरीज