Satara Loksabha : राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांचं (Loksabha Election) वारं वाहु लागलंयं. सर्वच पक्षांकडून मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात येत आहेत. मात्र, अद्याप सातारा लोकसभा मतदारसंघाचा पेच सुटलेला नसतानाच आणखी एका उमेदवाराने उडी घेतलीयं. प्रत्येक निवडणुकीत कोणत्या ना कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणारे बिग बॉस फेम डॉ. अभिजित बिचुकले (Abhijit Bichukale) यांनीही सातारा लोकसभेसाठी (Satara Loksabha) उडी घेतलीयं.
Ahmednagar : शिर्डी लोकसभा! ‘महायुती धर्म पाळा’… आठवलेंच्या उमेदवारीसाठी आरपीआय आक्रमक
आधीच सातारा लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीकडून आणि महाविकास आघाडीकडून नेमका कोण उमेदवार असणार याची उत्कंठा लागलेली आहे. महायुतीकडून उदयनराजे भोसले यांना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी शब्द दिलायं तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडूनही नितीन पाटलांनी साताऱ्यासाठी दंड थोपटले आहेत. सोबतच शिंदे गटाचे पुरुषोत्तम जाधव हेही सातारा लोकसभेसाठी इच्छूक असल्याचं बोललं जात आहे. तर भाजपकडूनही नरेंद्र पाटील मैदानात उतरतील असं सांगितलं जातं आहे. अशात आता अभिजित बिचुकलेंनी उडी मारली आहे.
BJP Candidate List : अभिनेत्री कंगना रणौत हिची अखेर राजकारणात एंट्री, भाजपने दिली लोकसभेची उमेदवारी
महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षांकडून श्रीनिवास पाटील, बाळासाहेब पाटील यांची नावे पुढे आहेत. यामुळे साताऱ्यातील निवडणुकीत रंगत भरायला सुरवात झाली आहे. पण, कोणाच्याही उमेदवारीची घोषणा झालेली नाही. केवळ दावेबाजीमुळे जागा वाटप व उमेदवारांची घोषणा रखडली आहे.