Download App

Cantonment Board Election : अहमदनगर छावणी परिषदेची पंचवार्षिक निवडणूक जाहीर…

अहमदनगर : अहमदनगर (भिंगार) छावणी परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अहमदनगरमधील भिंगार छावणी मंडळाच्या 7 जागांसाठी 30 एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यासंदर्भात छावणी परिषदेचे ब्रिगेडिअर रसल डिसुजा यांनी मंगळवारी 28 फेब्रुवारी रोजी अधिसूचना जारी केली आहे. अधिसूचना जारी होताच आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.

या निवडणुकीत 7 वार्डातून 7 नगरसेवकांची निवड छावणी मंडळावर होणार आहे. या निवडणूक कार्यक्रमाबरोबरच पुरवणी मतदार यादीचाही कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
निवडणुकीसाठी 30 एप्रिल रोजी मतदान पार पडणार आहे.

सभागृहात तुमचेही आमदार, त्यांनाही चोर म्हणणार का? गुलाबराव पाटील आक्रमक

छावणी मंडळाचे ब्रिगेडिअर रसल डिसुजा यांच्या अधिसूचनेनंतर सर्वच राजकीय पक्षांकडून निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. भिंगार शहरातील एकूण 7 वार्डांसाठी मतदान होणार असून त्यापैकी वार्ड क्रमांक 4 आणि वार्ड क्रमांक 6 महिला राखीव तर वार्ड क्रमांक 7 अनुसूचित जातीसाठी राखीव आहे.

निवडणुकीसाठी 21 ते 22 मार्चदरम्यान उमेदवारी अर्जांची विक्री होणार असून २३ मार्चला उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. दाखल उमेदवारी अर्जांची यादी २३ मार्चला प्रसिध्द केली जाणार आहे.

Budget Session : चोर मंडळात उद्धव ठाकरेही.., देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांवर पलटवार

उमेदवारांच्या अर्जावर 27 मार्चपर्यंत हरकती नोंदवता येणार आहेत. तर 29 मार्चपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे येणार आहे. ज्या उमेदवारांच्या अर्जांवर हरकती असतील त्या अर्जांवरी निर्णय प्रलंबित आहे.

या उमेदवारांसाठी 31 मार्चला अर्ज माघारीसाठी मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर ६ एप्रिल रोजी निवडणूक चिन्हांसह उमेदवारांची यादी प्रसिध्द होणार आहे. त्यानंतर ३० एप्रिल रोजी मतदान पार पडणार असून २ मे रोजी मतमोजणी होणार आहे.

दरम्यान, देशभरातील 56 छावणी परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अधिसूचना केंद्र सरकारकडून जारी करण्यात आली आहे. यामध्ये पुणे, नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर, नागपूर, छावणी मंडळाचाही समावेश आहे.

Tags

follow us