सोशल मीडियावर पोस्ट करताय तर सावधान… पोलिसांचा असणार वॉच!

अहमदनगर : समाजकंटकांकडून सोशल मीडियामध्ये चुकीचे संदेश व अफवा पसरविल्या जातात व त्यातून दोन समाजात तेढ निर्माण होते. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांचा सोशल मीडियावर वॉच राहणार असून, अफवा पसरविणार्‍यांविरूध्द कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिला आहे. जिल्ह्यात आगामी काळात रामनवमी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, महावीर जयंती […]

Untitled Design   2023 03 28T172333.297

Untitled Design 2023 03 28T172333.297

अहमदनगर : समाजकंटकांकडून सोशल मीडियामध्ये चुकीचे संदेश व अफवा पसरविल्या जातात व त्यातून दोन समाजात तेढ निर्माण होते. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांचा सोशल मीडियावर वॉच राहणार असून, अफवा पसरविणार्‍यांविरूध्द कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिला आहे.

जिल्ह्यात आगामी काळात रामनवमी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, महावीर जयंती आदी विविध सण-उत्सव साजरे होत आहेत. परंतु, सध्या सोशल मीडियात अफवा पसरविणारे मेसेज व्हायरल होत असल्याच्या काही घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे शहरात सामाजिक शांतता राहावी, यासाठी पोलिस प्रशासनाने प्रयत्न सुरू केले आहेत.

याबाबत दोन्ही समाजाचे प्रमुख मंडळाचे प्रमुख ट्रस्टी यांची मीटिंग घेऊन आपले अधिनस्त मुलांना याबाबत योग्य ते मार्गदर्शन करून कोणत्याही बेकायदेशीर आणि वादविवाद होऊ शकतो अशा फेसबुक पोस्ट इंस्टाग्राम पोस्ट व्हाट्सअप पोस्ट करू नये स्टेटस ठेवू नये याबाबत सूचना देण्यात आले आहेत. तसेच रामनवमीच्या पार्श्वभूमिवर पोलिस प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक कारवाया केल्या आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टाग्राम, फेसबूक आदी सोशल मीडियावर आलेल्या आक्षेपार्ह मेसेजला कोणताही प्रतिसाद न देण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. नागरिकांनी कोणतेही बेकायदेशीर आणि वाद होऊ शकतात असे संदेश फॉरवर्ड करू नयेत. आक्षेपार्ह मजकूर किंवा कमेंट करू नये.

शहरात जातीय तणाव निर्माण करणारे मेसेज व्हायरल केल्यास पोलिसांकडून कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. अशाप्रकारे मेसेज व्हायरल करणाऱ्यांवर गेल्या काही दिवसात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.

व्हॉट्सअ‍ॅपला करा ‘ओन्ली अ‍ॅडमिन’
सण-उत्सवाच्या काळात सोशल मीडियावरून आक्षेपार्ह मेसेज काही समाजकंटकांकडून पसरविण्यात येतात. त्यामुळे दोन समाजात तेढ निर्माण होते. या प्रकाराला टाळण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपवर असलेल्या ग्रुपच्या अ‍ॅडमिनने ‘ओन्ली अ‍ॅडमिन कॅन सेंड मेसेज ’ ही सेटिंग करण्याचे आवाहनही कोतवाली पोलिसांनी केले आहे. त्यास सर्वच प्रमुखांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे.

सावरकर वाद! ठाकरेंची बाजू घेत शरद पवार यांनी राहुल गांधींना सुनावलं

सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर आढळून आल्यास आपसात वाद न घालता संबंधित व्यक्तीची माहिती नागरिकांनी तत्काळ पोलिसांना द्यावी. त्यासाठी कोतवालीचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या 7777924603 या क्रमांकावर टेक्स मेसेज किंवा व्हॉट्सअ‍ॅप मेसेज करून कळवण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.

Exit mobile version