Download App

राज्यातील सरकार शेतकऱ्यांबाबत असंवेदनशील; ‘त्या’ अहवालावरून शेलारांचा निशाणा

  • Written By: Last Updated:

Ghansham Shelar BRS Party : मराठवाडा विभागाचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर (Sunil Kendrekar) यांनी एक अहवाल तयार केला. यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांचा वास्तव मांडणारा अहवाल सादर केला. शंभर दिवसांमध्ये 1700 शेतकऱ्यांनी विविध कारणास्तव आत्महत्या केल्या आहेत, असे अहवालात मांडले आहे. यामुळे केंद्रेकर यांनी शासनाला शिफारस केली की तेलंगणा सरकार प्रमाणे महाराष्ट्र सरकारने देखील शेतकऱ्यांना प्रतिमहिना 10 हजार रुपये अनुदान दिले पाहिजे. मात्र सभागृहात संवेदना नसलेल्या सरकारने हा अहवाल नाकारला आहे, अशा असंवेदनशील सरकराचा मी निषेध करतो असे प्रतिपादन बीआरएसचे नेते घनश्याम शेलार (Ghanshyam Shelar) यांनी केले आहे. (BRS Party  Ghansham Shelar On shinde fadanvis pawar goverment over sunil kendrekar report)

बीआरएसमध्ये प्रवेश केलेले घनश्याम शेलार हे अहमदनगरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. यावेळी तेलंगणा सरकार कशा पद्धतीने शेतकऱ्यांसाठी काम करत आहे. तर दुसरीकडे राज्यातील सरकार शेतकऱ्यांविषयी अत्यंत संवेदनहीन आहे अशा शब्दात शेलार यांनी आपला संताप व्यक्त केला. यावेळी त्यांनी मराठवाडा विभागाचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या अहवालाचा हवाला देत राज्यातील सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली.

पुण्यात सायबर चोरट्यांनी बँकेची केली एक कोटीची फसवणूक, असा मारला डल्ला 

यावेळी बोलताना शेलार म्हणाले, कधी अतिवृष्टी तर कधी अवकाळीमुळे राज्यातील अनेक ठिकाणचे शेतकरी संकटात सापडले आहेत. यातच विविध कारणास्तव ते आत्महत्या सारखे पाऊल उचलत आहे. दरम्यान शेतकऱ्यांचे होणारे हाल व बळीराजाच्या आत्महत्या रोखण्यासाठी मराठवाडा विभागाचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी एक अहवाल तयार केला. राज्यातील शेतकऱ्यांना तेलंगणा सरकारप्रमाणे 10 हजार रुपये प्रतिमहिना अनुदान देण्यात यावे, अशी शिफारस करण्यात आली.

केंद्रेकर यांनी अनेक शिफारशी केल्या. मात्र संवेदनाहीन सरकारने हा अहवाल नाकारला आहे. ही निषेधार्थ बाब आहे. शेतकऱ्यांच्या कल्याणाच्या योजना हे अस्तित्वात असलेलं राबवू शकतच नाही. त्यामुळे या शेतकरी कल्याणाच्या योजना राबवायच्या असतील तर सर्वांपुढे बीआरएस शिवाय आता कोणताच पर्याय राज्यात उपल्बध राहिलेला नाही, असं देखील यावेळी घनश्याम शेलार म्हणाले.

Tags

follow us