पुण्यात सायबर चोरट्यांनी बँकेची केली एक कोटीची फसवणूक, असा मारला डल्ला

  • Written By: Published:
पुण्यात सायबर चोरट्यांनी बँकेची केली एक कोटीची फसवणूक, असा मारला डल्ला

पुण्यातून एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. पुणे भारती सहकारी बँकेच्या खातेदारांची बनावट डेबिट कार्ड तयार करून सायबर चोरट्यांनी खातेदारांच्या खात्यातून एक कोटी रुपये लंपास केले आहे. या चोरट्यांनी बनावट डेबिट कार्ड द्वारे दिल्ली, मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर येथील एटीएममशीन मधून पैसे काढल्याचे तपासातून समोर आले आहे. (cyber thieves cheated bharti sahakari bank in pune to rs one crore)

बँकेचे संचालक सर्जेराव पाटील यांनी या गुन्ह्याची फिर्याद विश्रामबाग पोलीस ठाण्यात दिली आहे. या बँकेची मुख्य शाखा सदाशिव पेठेत आहे. 2020 ते 2021 कालावधीत सायबर चोरट्यांनी बनावट डेबिट कार्ड तयार करून पुण्यातील सदाशिव पेठ, धनकवडी, धानोरी, आकुर्डी, कोथरूड, बाणेर, हडपसर, नवी मुंबई, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, इस्लामपूर, वरळी, तसेच दिल्लीतील एटीएम केंद्रातून भारती सहकारी बँकेच्या खात्यातून एक कोटी रुपये लंपास केले आहे. सायबर चोरट्यांनी फसवणूक करण्यासाठी 420 बनावट डेबिट कार्डचा वापर केल्याचे समोर आले आहे.

पटेलांच्या ‘त्या’ वक्तव्यावर रोहित पवारांना वेगळाच संशय; म्हणाले, हा तर देवेंद्र फडणवीसांना…

420 बनावट डेबिट कार्डद्वारे चोरट्यांनी एक हजारापेक्षा जास्त व्यवहार करण्यात आले आहेत. या आगोदर 2018 मध्ये पुण्यातील कॉसमॉस बँकेवर देखील सायबर चोरट्यांनी डल्ला टाकत जवळपास 95 कोटी रुपयांची रक्कम लंपास केले होते.

 

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube