Download App

बीआरएसला महाराष्ट्रात पहिला धक्का, भगिरथ भालके वेगळ्या वाटेवर?

Bhagirath Bhalke : पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत तेलंगणामध्ये (Telangana Assembly Elections) बीआरएसला (BRS) मोठ धक्का बसला आहे. काँग्रेसने एकहाती विजय मिळवत के चंद्रशेखर राव (K Chandrasekhar Rao) यांची सत्ता उलथावून लावली आहे. या दारुण पराभवाचा पहिला धक्का बीआरएसला महाराष्ट्रात बसला आहे. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीला रामराम ठोकून बीआरएसमध्ये गेलेले भगिरथ भालके (Bhagirath Bhalke) पुन्हा नव्या पक्षाची वाट धरण्याची शक्यता आहे. त्यांच्या सोशल मीडिया पेजवर ‘प्रारंभ नव्या युगाचा, नव्या पर्वाचा’ असं पोस्टर शेअर केले आहे. त्यामुळे पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात वेगवेगळ्या चर्चांना उधान आले आहे.

दरम्यान, 2019 मध्ये आमदार भारत नाना भालके यांचे निधन झाले होते. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीने भगिरथ भालके यांना उमेदवारी दिली होती. तर भाजपने साधना आवताडे यांना उमेदवारी दिली होती. त्यावेळी चुरशीच्या निवडणुकीत भगिरथ भालके यांचा 3600 मतांनी पराभव केला होता.

Rupali Chakankar यांच्याबाबात अश्लील पोस्ट; पुणे पोलिसांनी उचलल मोठं पाऊल

त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विठ्ठल सहकारी साखर कारन्यावर शेतकरी मेळावा घेतला होता. यावेळी विठ्ठल साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यावेळी पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघातून अभिजीत पाटलांना उमेदवारी देण्याचे संकेत शरद पवार यांनी दिले होते. यावरुन नाराज झालेल्या भगिरथ भालके यांनी थेट राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत बीआरएसमध्ये प्रवेश केला होता.

Maratha Reservation: आरक्षण मिळू द्या, याच्यात किती दम आहे तो बघायचाय; जरांगेंचे भुजबळांना पुन्हा चँलेज

भारत नाना भालके आमदार असताना अजित पवार यांच्या जवळचे मानले जात होते. आता राष्ट्रवादीत दोन गट तयार झाल्याने भगिरथ भालके अजित पवार गटात जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. भगिरथ भालके यांना मानणार पंढरपूरमध्ये मोठा मतदार आहे. त्यामुळे तेलंगणातील पराभवानंतर बीआरएसला महाराष्ट्रात बसलेला मोठा धक्का मानला जात आहे.

Tags

follow us