Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारला 24 डिसेंबरपर्यंत मुदत दिल्यानंतर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी उपोषण स्थगित केले असले तरी राज्यभरात दौरे सुरू केले आहेत. जरांगे पाटील यांचा पश्चिम महाराष्ट्र दौरा सुरू आहे. बुधवारी सकाळपासून आंतरवाली सराटी येथून दौऱ्याला सुरुवात झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथे पोहोचल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा सरकारला कडक शब्दांत इशारा दिला. राज्य सरकारने 24 डिसेंबरच्या आता मराठा आरक्षण जाहीर करावे अन्यथा संघर्ष अटळ आहे, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला. मराठा समाजाला आरक्षण घेतल्याशिवाय एक इंचही मागे हटणार नाही. एक डिसेंबरपासून गावागावात साखळी उपोषण सुरू करा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
मराठा समाजाला आरक्षण मिळवूनच घेणार आहोत. मराठा समाजासाठी 75 वर्षांमध्ये कोणी काय केलं? हे 24 डिसेंबरनंतर आम्ही मांडणार आहोत. पण आज मराठा समाजाचा अजेंडा एकच आहे की, मागचं काय झालं? हे 24 डिसेंबरपर्यंत आम्ही काढत नाही, पण त्यानंतर मात्र कोणालाही सुट्टी नाही असेही जरांगे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत सांगितले होते.
जरांगे पाटील 15 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर या काळात राज्याचा दौरा करणार आहोत. या दौऱ्यात गावागावात सभा घेणार आहे. एकूण सहा टप्प्यात हा दौरा असणार आहे. या दौऱ्यात ठाणे, पालघर, नाशिक, त्र्यंबकेश्वर, नेवासा, संगमनेर आणि श्रीरामपूर यांसह अनेक ठिकाणी भेटी दिल्या जाणार आहेत. या सोबतच 1 डिसेंबरपासून गावागावात साखळी उपोषणही केले जाणार आहे.
16 नोव्हेंबर दौंड, मायनी, 17 नोव्हेंबर सांगली, कोल्हापूर, कराड, इस्लामपूर, 18 नोव्हेंबर सातारा, वाई, रायगड, 19 नोव्हेंबर रायगड, पाचाड, महाड, मुळशी, आळंदी, 20 नोव्हेंबर तुळापूर, पुणे, खराडी, चंदननगर, खालापूर, कल्याणा, 21 नोव्हेंबर ठाणे, पालघर, त्र्यंबकेश्वर, 22 नोव्हेंबर विश्रांतगड, संगमनेर, श्रीरामपूर, 23 नोव्हेंबर नेवासा, शेवगाव, बोधेगाव असा दौरा राहणार आहे. दौऱ्याच्या पुढील टप्प्यात विदर्भ, उर्वरित मराठवाडा आणि कोकणातील जिल्ह्यात जाणार आहोत, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
Manoj Jarange : ‘त्या’ हल्ल्याची एसआयटी चौकशी कराच! मनोज जरांगेंचं भुजबळांना प्रत्युत्तर
आरक्षण विरोधी नेत्यांची नाव जाहीर करू
आमच्याकडे पुरावे आहेत की आम्ही आधीपासूनच कुणबी आहोत. आम्ही असं केलेलं नाही की आमच्याकडे पुरावा नाही आणि आम्ही ओबीसीत गेलोय. तसं काहीच केलेलं नाही. आमच्याकडे पुरावे आहेत म्हणूनच आम्हाला प्रमाणपत्र मिळू लागली आहेत. सामान्य ओबीसींना माहिती आहे की मराठा आणि ओबीसीत भांडण लावण्याचं काम ओबीसी नेते करत आहेत. हे हेच लोक म्हणत आहेत कारण त्यांना वस्तुस्थिती माहिती आहे. 24 डिसेंबरपर्यंत जर आम्हाला आरक्षण मिळालं नाही तर आरक्षण विरोधी नेत्यांची नावं जाहीर करू असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी दिला होता.