Manoj Jarange : ‘त्या’ हल्ल्याची एसआयटी चौकशी कराच!’; मनोज जरांगेंचं भुजबळांना प्रत्युत्तर

Manoj Jarange : ‘त्या’ हल्ल्याची एसआयटी चौकशी कराच!’; मनोज जरांगेंचं भुजबळांना प्रत्युत्तर

Manoj Jarange : मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान (Maratha Reservation) पोलिसांकडून झालेल्या लाठीहल्ल्याचा मुद्दा आता तापू लागला. या लाठीचार्जवेळी काही पोलिसही जखमी झाले होते. त्यामुळे या घटनेची चौकशी होऊन ज्यांनी दगडफेक केली त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी राज्य सरकारमधील मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केली होती. त्यावर आता मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. आंतरवालीतीसल हल्ल्यामागे मोठं षडयंत्र आहे. त्यामुळे या हल्ल्याची एसआयटी चौकशी करा, अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली. जरांगे पाटील म्हणाले, आता काही जण शांततेत आंदोलन करत असताना त्यांना अडकवले जात आहे. आम्ही आमचं हक्काचं आरक्षण मागत आहोत. आमचंच आरक्षण आम्हाला द्या असं आम्ही म्हणत आहोत.

तुम्ही तर आमचा जीव वाचवायला आला नाही, पण जे न्यायमूर्ती जीव वाचवायला आले, त्यांच्याबद्दल देखील छगन भुजबळ यांनी खालच्या पातळीवर बोलायला सुरूवात केली. बीडमधील हिंसाचाराचं आम्ही समर्थन करत नाही, मराठा आंदोलनाला गालबोट लागण्यासाठी जाणिवपूर्वक प्रयत्न केले जात असल्याचा आरोपही यावेळी जरांगे पाटील यांनी केला. मराठ्यांना कुणबी आरक्षण दिल्यामुळं ओबीसींचं आरक्षण कसं संपणार? असाही प्रश्न मनोज जरांगे यांनी उपस्थित केला. जे मराठा समाजाच्या हक्काचं आहे ते आम्ही मागत आहोत.

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटलांचा मेगा प्लॅन! पुन्हा सुरू करणार महाराष्ट्र दौरा

माणसानं भानावर राहून बोललं पाहिजे. आता तर ते खूपच खालचं बोलायला लागले आहेत. न्यायदानाचं काम हे न्यायाधीश करतात. त्यांनी जीव वाचवण्याचं काम केलं. जीव वाचवण्यासाठी तुम्ही तर येत नाही, तुम्ही तर जीव घ्यायला निघाला. पण जे आलेत त्यांच्यावर असे बोलत असाल तर काय बोलणार? असंही जरांगे पाटील म्हणाले. जालन्यात आंदोलन करणाऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यावर भुजबळांनी पोलिसांची बाजू घेऊन आपल्यावर टीका केली. मी तर म्हणतोय की याची सखोल चौकशी करा. तुम्ही जे बोलताय ते खरं असेल तर तुमच्या सरकारकडून चौकशी करा. जे या प्रकरणात बडतर्फ व्हायला पाहिजे होते, ते बाजूलाच राहिलेत आणि कारवाई दुसऱ्या पोलिसांवरच केली, असा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला.

जाळपोळीचं कधीच समर्थन नाही 

ओबीसी बांधवांवर अन्याय होत तेव्हा त्यांच्याकडे कुणी गेलं नाही. आमच्या नोंदी सापडत असतील तर कुणबी प्रमाणपत्र द्यायला काही हरकत नसावी. संदीप क्षीरसागर यांचं घर जाळण्याचं समर्थन आम्ही कधीच केलं नाही, असेही जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.

काय म्हणाले होते छगन भुजबळ?

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube