Download App

आमदार संग्राम जगतापांनी स्थानिक राजकीय मंडळींनाही सोडलं नाही…

नगरमध्ये घडत असलेल्या घडामोडींविषयी आमदार संग्राम जगताप यांनी लेट्अपला दिलेल्या मुलाखतीत आपली भूमिका स्पष्ट केलीय. या मुलाखती दरम्यान बाहेरच्या लोकांना कोण जिल्ह्यात आणतंय? शहरांत कोण अशांतता पसरवण्याचं काम करीत आहेत? याबद्दल स्पष्ट केलंय आहे.

आमदार संग्राम जगताप म्हणाले, बाहेरच्या लोकांना इथल्या प्रश्नांची माहिती नाही. ज्या लोकांना इथं कोणी विचारत नाहीत. लोकं बाहेरच्या लोकांना जिल्ह्यात आणतात, जेणे करुन हे असे काही बोलले की त्यातून फायदा होईल, असा त्यांचा गैरसमज आहे. बाहेरचे माणसं आल्याने इथले प्रश्न सुटतील, असं नाही. राणेंशी माझं वैयक्तिक काही भांडण नसून राजकारणाचा अजेंडा समोर ठेवत त्यांनी माझ्याबद्दल वक्तव्य केल्याचंही जगताप म्हणाले आहेत.

मोदी मुंबईत आल्यानं काहींना पोटदुखी…शिंदेचा विरोधकांवर हल्लाबोल

स्थानिक राजकीय मंडळींपैकी चार ते पाच जण शहरात सक्रिय आहेत. ही स्थानिक मंडळी दोन गटांमध्ये वाद घालण्यासाठी खतपाणी घालत आहे. स्वत:च्या नेतृत्वातून आपलं कर्तृत्व सिद्ध करावं लागतं, स्थानिक मंडळी जे करीत आहेत, त्यातून काहीही साध्य होणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. ही स्थानिक मंडळी चार ते पाचच लोकं असून ते ठराविकच असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. मात्र, यावेळी त्यांनी त्यांची नावे जाहीर करणं टाळलं आहे.

Market Committee elections : श्रीगोंदा बाजार समितीसाठी पाचपुते-नागवडे कट्टर विरोधक एकत्र

तसेच जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा आम्ही पीडितांच्या भावना समजून घेत त्यांना आधार देण्याचं काम करीत असतो. तर दुसरकीकडे पोलिस प्रशासनांवर राज्यातील सत्ताधाऱ्यांकडून दबाव टाकून पोलिसांचा तपास पुढे जात नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आहे. तसेच काही लोकांना वाटतंय की निवडणुका डोळ्यासमोर ठेवून एक नेतृत्व उदयास येत पण आताच्या काळात तसं होतं नाही.

तापमान 42 अंशावर, ठाणे महानगरपालिकेने दिला सतर्कतेचा इशारा; सांगितलं ‘ही’ काळजी घ्या

या स्थानिक राजकीय मंडळींना आपण लोकांसाठी काय करु शकतो याचा विचार करुन लक्ष देण्याची गरज असून ही लोकं इतकी मोठी लोकं नाहीत की त्यांची नावे घेतली पाहिजेत, असा खोचक टोलाही त्यांना स्थानिक मंडळींना लगावला आहे.

“देशपांडेच्या जीवाला किंमत आणि श्री सदस्यांचा जीव…” संदीप देशपांडेचं उदाहरण देत अंधारेंचा भाजपला टोला

दरम्यान, इथल्या व्यापाऱ्यांनी या लोकांच्या अफवांना बळी पडू नये, तसेच घाबरुन न जाता व्यापार, उद्योग करावा, आम्ही तुमच्या मागे उभे असल्याचं ते म्हणाले आहेत.

Tags

follow us