तापमान 42 अंशावर, ठाणे महानगरपालिकेने दिला सतर्कतेचा इशारा; सांगितलं ‘ही’ काळजी घ्या

तापमान 42 अंशावर, ठाणे महानगरपालिकेने  दिला सतर्कतेचा इशारा; सांगितलं ‘ही’ काळजी घ्या

Temperature at 42 degrees, Thane Municipal Corporation issues alert : दोन दिवसांपूर्वी आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं. या पुरस्कार सोहळ्यासाठी लाखोंच्या संख्येनं धर्माधिकारी यांच्या अनुयायांनी हजेरी लावली होती. मात्र, या सोहळादरम्यान रणरणत्या उन्हात जमलेल्या लाखो भाविकांपैकी 13 जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला, तर शेकडो जण आजारी पडले. दरम्यान, राज्यात उन्हाचा पारा वाढू लागला आहे. त्यामुळं नागरिक चांगलेच हैराण झाले आहेत. मुंबई-ठाण्यालाही या उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागत आहे. ठाण्याचे तापमान 42 अंशांवर आहे. सन स्टोक्स खूप आले आहेत. त्यामुळं टीएमसीने आपल्या नागरिकांसाठी हे पत्रक काढले आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा पारा वाढत असून वाढत्या उन्हामुळे नागरिक हैराण झाले आहेत. राज्यात सातत्यानं बदल होत आहेत. ठाण्यात काही दिवसांपासू तापमान 42 अंशावर गेले आहे. त्यामुळं उकाड्यात प्रचंड वाढ होत असून ठाणेकरांना घामाच्या धारा लागल्या आहेत. दुपारी 12 ते 4 यावेळेत उन्हाचा तडाखा सर्वांधिक असल्यानं घराबाहेर पडणंही मुश्कील झालं आहे. त्यामुळं रस्त्यावर नागरिकांची वर्दळ कमी झाली आहे. तापमानात मोठी वाढ होत असल्यानं ठाणेकरांच्या जीवाची लाही लाही होत आहे. दरम्यान ठाणे महानगरपालिकेने नागरिकांसाठी एक पत्रक काढण्यात आले आहे.

Pune Scam : जास्त व्याजाचे अमिष भोवले; गुंतवणूकदारांची सातशे कोटींची फसवणूक !

या पत्रकात सांगण्यात आलं की, उष्माघाताच त्रास होत असल्यास 911 या नंबरवर नागिरकांना कॉल करावा. थेट सूर्याच्यचा किरणांच्या संपर्कात येणं टाळावं. नागरिकांनाी उन्हात जास्त न फिरता आलल्या शरीराचं तापमान कसं थंड राहील, याची काळजी घ्यावी. उन्हापासून बचाव करण्यासाठी शऱीरातील पाण्याचं प्रमाण संतुलित ठेवावं. शरीर डिहायट्रेट होणार नाही, याची काळजी घ्यावी. कडक उन्हात बाहेर जातांना आवर्जून डोके झाकावे. चहा, कॉफी, सॉप्ट ड्रिंग्स टाळावे. हलक्या रंगाचे सुती कपडे वापरावे. बाहेर पडतांना जवळ ग्लुकॉन डी पावडर सोबत बाळगावी

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube