Download App

पावसाचा मुक्काम वाढला! मुसळधार पावसाची सर्वदूर हजेरी; आज ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी

रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांसह पुणे आणि साताऱ्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Monsoon Rain Update : मान्सूनचा परतीचा पाऊस राज्यात धुमाकूळ घालत आहे. मुंबई पु्ण्यासह सर्वत्र पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मागील चार ते पाच दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. आजही पावसाचा मुक्काम आहे. रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांसह पुणे आणि साताऱ्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर अन्य भागांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.

मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. त्यामुळे राज्यात (Maharashtra Rain Alert) पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. मुंबईसह काही जिल्ह्यांत (Monsoon Rain Update) जोरदार पाऊस झाला. अहिल्यानगर शहरात शनिवारी दुपारपासून रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरूच होता. रविवारीही दिवसभर पाऊस सुरूच होता. सोमवारी सकाळपासूनच संततधार पाऊस सुरू आहे. ढगाळ हवामान कायम आहे. राज्यात अन्य ठिकाणीही अशीच परिस्थिती दिसून येत आहे. सोलापूर जिल्ह्याला तर पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे.

Maharashtra Rain : पुढील दोन दिवस महत्वाचे, आभाळात ढगांची गर्दी; ‘या’ जिल्ह्यांत पाऊस कोसळणार

मुंबईतील कांदिवली, बोरिवली, मालाड, अंधेरी, दहिसर, गोरेगाव, विलेपार्ले, सांताक्रूझसह अन्य उपनगरात जोरदा पाऊस सुरू झाला आहे. पुढील काही तासांत अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. राज्यात अन्य जिल्ह्यांतही पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यातील काही भागांमध्ये आज पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. कोकणात हवामान विभागाचा पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पुढील काही तासांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. यामुळे अतिमहत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडा अन्यथा घराबाहेर पडूच नका असे आवाहन करण्यात आले आहे. जालना जिल्ह्याला पुढील तीन दिवस यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

प्रशासनाच्या नागरिकांना सूचना

नागरिकांनी अशा परिस्थितीत घराबाहेर न घोंडता सतर्क राहावं; प्रशासन आणि बचाव यंत्रणांनी पूर, व्यापार आणि रहदारी व्यवस्थापनासाठी सज्ज राहावं, ही विनंती संबंधित अधिकाऱ्यांनी केली आहे. नागरिकांनी शक्यतो घराबाहेर न पडता, अलर्टची सतत माहिती घेत, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. फारच महत्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडता येईल.

कोकण, मराठवाडा अन् विदर्भात जोरधार; ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट, वाचा हवामानाचा अंदाज

follow us