Download App

कट्टर विरोधक धनंजय महाडिक आणि ऋतुराज पाटील एकाच मंचावर; अनेकांच्या भुवया उंचावल्या

  • Written By: Last Updated:

कोल्हापूर : सतेज पाटील (Satej Patil) आणि धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) ही दोन्ही नावे राज्याला नवीन नाहीत. एक काँग्रेसचे मातब्बर नेते तर दुसरे भाजपचे खासदार. पाटील आणि महाडिक गट हे कोल्हापूरच्या राजकारणातील मोठं प्रस्थ आहेत. काही दिवसांपूर्वीच या दोन्ही गटांनी एकमेकांना ‘बिंदू चौकात या, हिशोब करू’ असे आव्हान दिले होते आणि त्यामुळे कोल्हापुरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मात्र, आता आमदार ऋतुराज पाटील (MLA Rituraj Patil) आणि खासदार धनंजय महाडिक हे एका कार्यक्रमात एकत्र आल्याचं पाहायला मिळालं.

ऋतुराज पाटील हे शिक्षणसम्राट डी.वाय.पाटील यांचे नातू असून आमदार सतेज पाटील यांचे पुतणे आहेत. आज गोकुळ शिरगाव एमआयडीसीमधील विकास कामांच्या उद्घाटनावेळी ऋतुराज पाटील आणि खासदार धनंजय महाडिक हे दोघेही एकत्र आले होते. कायम एकमेकांना संपण्यासाठी इरेला पेटलेले कोल्हापुरच्या राजकारणातील पाटील गटातील आणि महाडिक गटातील हे कट्टर विरोधक असलेले नेत एकाच मंचावर हजर राहिल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

सध्या आमच्या दुकानात गिऱ्हाईकांची कमी नाही, मात्र ओरिजनल गिऱ्हाईक…नितीन गडकरींचे सूचक वक्तव्य 

या दोन्ही गटांनी कायम एकमेकांना आव्हानं दिलं होतं. त्यामुळं या कार्यक्रमात दोन्ही गटाचे कार्यकर्ते काहीतरी राडा करतील, अशी धाकधुक उपस्थितांना होती. कारण दोनच महिन्यापूर्वी या गटानी एकमेकांना आव्हान समोर या, एकदा हिशोब करू असं आव्हान दिलं होतं. त्यानंतर हे नेते एकत्र आले. मात्र, या कार्यक्रमात कुठलाही राडा, वादावादी,बाचा-बाची झाली नाही. उलट, यावेळी या दोन्ही नेत्यांना विकास कामांच्या उद्घाटप्रंसगी भाषणं केली. इतकचं नाही तर आपापल्या भाषणात एकमेकांचा उल्लेखही केला. मात्र, एकमेकांना बोलणं टाळलं.

काँग्रेसच्या अनेक बड्या नेत्यांशी जवळीक असलेल्या सतेज पाटील यांचं जिल्ह्यात वाढतं प्रस्थ आहे. पाटील यांनी महाडिकांच्या ताब्यातून कोल्हापूर महापालिकाही हिसकावून घेतली होती. हसन मुश्रीफ यांच्या मदतीने जिल्हा बँकही ताब्यात घेतली होती. तर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत सतेज पाटील यांनी महाडिक विरोधकांच्या विरोधकांना एकत्र करून शिवसेनेचे संजय मंडलिक यांना निवडणूण आणलं होतं. एवढेच नाही तर पाटील गटाने गोकुळ काबीज केलं. त्यामुळं पाटील आणि महाडिक यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र झाला. गेल्या राज्यसभा निवडणुकीच्या वेळी धनंजय महाडिक यांना राज्यसभेवर उमेदवारी देऊन ते खासदार झाले.

दरम्यान, आज दोन्ही गटातील नेते एकाच मंचावर एकत्र आल्यानं भविष्यात हे दोन्ही गट एक होणार का, हेच पाहणं महत्वाचं आहे.

Tags

follow us