Download App

Sangli Loksabha : सांगलीत आम्हीच किंग! विशाल पाटलांनी सिद्ध करुन दाखवलंच…

सांगली लोकसभेत विजय खेचून आणत आम्हीच सांगलीचे किंग असल्याचं अपक्ष उमेदवार विशाल पाटलांनी सिद्ध करुन दाखवलं आहे.

Image Credit: Letsupp

Sangli Loksabha : सांगली लोकसभा मतदारसंघात (Sangli Loksabha) महायुती आणि महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांना धूळ चारुन सांगलीचे आम्हीच किंग असल्याचं अपक्ष उमेदवार विशाल पाटलांनी (Vishal Patil) सिद्ध करुन दाखवलं आहे. सांगलीत लोकसभा मतदारसंघात विशाल पाटलांनी (Vishal Patil) मोठं मताधिक्य घेत अखेर विजय खेचून आणलायं. अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना 4 लाख 29 हजार 947 मते मिळाली असून महायुतीचे उमेदवार 3 लाख 50 हजार 300 मते मिळाली आहेत. तर महाविकास आघाडीचे उमेदवार 49 हजार 254 मते मिळाली आहेत. दरम्यान, विशाल पाटील यांनी 79 हजार 647 मतांनी विजय खेचून आणलायं. विशाल पाटील यांनी महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांना मोठा धक्काचं दिला असल्याचं दिसून येत आहे.

सांगली लोकसभा मतदारसंघात अनेक नाट्यमय घडामोडी झाल्याचं दिसून आलं होतं. काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या या मतदारसंघातून काँग्रेसचे माजी नेते आणि वसंत पाटील यांचे नातू विशाल पाटील लोकसभेसाठी आग्रही होते. मात्र, ऐनवेळी ही जागा ठाकरे गटाला गेल्याने विशाल पाटलांनी बंडखोरी करीत अपक्ष निवडणूक लढववलीयं. याचदरम्यान, महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांकंडून त्यांची मनधरणी करण्यात आली, विशाल पाटलांनीही महाविकास आघाडीच्या नेत्यांना पुर्नविचार करण्याबाबतच्या सूचना दिल्या, मात्र मनधरणी आणि पाटलांच्या सूचना फेल ठरल्या. अखेर निवडणूक झाली अन् विशाल पाटलांनी महायुतीचे विद्यमान खासदार संजय काका पाटलांसह महाविकास आघाडीचे उमेदवार पैलवान चंद्रहार पाटलांना चीतपट केलंय.

follow us

वेब स्टोरीज