Download App

सांगलीच्या मैदानातील कोणत्या पाटलांकडं सर्वाधिक जमीन अन् जुमला?

Sangli Loksabha : देशासह राज्यात लोकसभा निवडणुकांचं वातावरण तापलं आहे. पुढील काही दिवसांतच मतदान प्रक्रिया पार पडणार असून उमेदवारांची अर्ज भरण्याच्या तारखाही संपल्या असल्याची परिस्थिती आहे. अशातच सांगली लोकसभा मतदारसंघात (Sangli Loksabha) विशाल पाटील (Vishal Patil) यांनी अपक्ष अर्ज भरल्याने तिरंगी लढत होणार आहे. सांगलीच्या तिन्ही उमेदवारांच्या मालमत्तेची माहिती समोर आली आहे. खासदार संजय काका पाटील (Sanjay Patil) सर्वांत श्रीमंत असून अपक्ष विशाल पाटील (विशाल पाटील) यांची संपत्तीही कोट्यवधींची आहे. तर शेतकऱ्याचा मुलगा म्हणून मैदानात उतरलेल्या डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील (Chandrahar patil) यांची संपत्ती दीड कोटींवर दाखवलीयं.

मुख्यमंत्र्यांनी विखे कुटुंबावर उधळली स्तुतीसुमन! म्हणाले, कुणीही आलं तरी यांची पाळमुळ…

सांगलीत सर्वात कमी संपत्ती असलेला उमेदवार चंद्रहार पाटील…
चंद्रहार पाटील हे बैलगाडा शर्यत, कुस्तीची मैदाने गाजवून चांगलेच चर्चेत आहेत. त्यांनी दाखल केलेल्या माहितीनूसार चंद्रहार पाटलांकडे 1 कोटी 80 लाख 23 हजार रुपयांची संपत्ती आहे. स्वत: खरेदी केलेली आणि अन्य मालमत्तेसह 1 कोटी 66 लाख एवढी संपत्ती आहे. तर बँका व अन्य संस्थांची ४ कोटी ५८ लाख रुपयांची कर्जे आहेत.

चंद्राहार पाटील यांच्याकडे 2 लाख 40 हजार रुपये तर पत्नी दिव्या यांच्याकडे 1 लाख 25 हजार रुपये एवढी रक्कम दाखवण्यात आली असून चंद्रहार पाटलांकडे 47 लाख रुपयांचं वाहन आहे. तर 9 लाख 58 हजारांचे सोने, असून 4 लाख 35 हजारांची चांदीदेखील आहे. त्यांना राज्य सरकारकडून 6 हजार रुपये मासिक मानधन मिळत आहे. तसेच स्वतःची शेतजमीन, प्लॉटदेखील आहेत. सांगलीतील आंबेगाव, भाळवणी, पाटण व गोजेगाव येथे शेतजमीन व प्लॉट असल्याची माहिती चंद्रहार पाटील यांनी दिलीयं.

Maldives Election: मालदीवमध्ये चीन समर्थक मुइझ्झूंचा मोठा विजय! पीएनसीने 93 पैकी 66 जागा जिंकल्या

विशाल पाटील कोट्याधीश…
विशाल पाटलांकडे 30 कोटी 52 लाखांची संपत्ती आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत 8 कोटी 80 लाख रुपयांची वाढ झाली आहे. तर त्यांच्या नावावर 26 कोटी 74 लाख 96 हजार रुपये, तर पत्नी पूजा पाटील यांच्या नावावर 3 कोटी 77 लाख 48 हजार रुपयांची संपत्ती आहे. जंगम व त्यावर मालमत्तेचा समावेश आहे. विशाल यांच्याकडे 10 कोटी 59 लाख 13 हजारांची जंगम, तर 16 कोटी 15 लाख 79 हजारांची स्थावर मालमत्ता आहे.

पत्नी पूजा यांच्या नावे 3 कोटी 3 लाख 73 हजारांची जंगम, तर 73 लाख 75 हजारांची स्थावर मालमत्ता आहे. विशाल यांच्या नावे असलेल्या कर्जाचा भार थोडा कमी झाला आहे. त्यांच्यावर सन 2019 मध्ये 10 कोटी 30 लाख 62 हजारांचे कर्ज होते. आता 7 कोटी 65 लाख आहे. पूजा यांच्या नावे 61 लाख 76 हजारांचे कर्ज आहे. पाच वर्षांत 2 कोटी 65 लाखांनी भार कमी झाला.

कॉंग्रेस जिहादींना पाठीशी घालतेय, मोदींना पाडण्यासाठी मशिदीतून फतवे…; राम सातपुतेंचा आरोप

संजय पाटील यांची दोन्ही उमेदवारांमध्ये सर्वाधिक संपत्ती असून त्यांच्या 48 लाख 31 लाख 39 हजार रुपये आहे. पत्नी ज्योती पाटील यांच्या नावे त्यांच्याहून अधिक संपत्ती असून जंगम मालमत्ता 30 कोटी 50 लाखांनी अधिक आहे. जंगमपैकी 32 कोटी 31 लाख रुपये असुरक्षित कर्ज म्हणून एसजीझेड अँड एसजी शुगर्स कंपनीला दिलेत.

तसेच जंगम मालमत्ता 2 कोटी 48 लाख रुपये, स्थावर मालमत्ता 45 कोटी 82 लाख रुपये दाखवली आहे. व्यवसाय व शेती हे उत्पन्नाचे स्रोत दाखवले आहेत. 53 कोटी 2 लाखांची कर्जे आहेत. त्यांची मालमत्ता 29 कोटी रुपयांनी तर कर्ज 51 कोटी रुपयांनी वाढले.

follow us