Download App

Accident : मालट्रकला टेम्पो धडकला! अपघातात तिघे जागीच ठार

Image Credit: Letsupp

Accident : रस्ते अपघाताच्या (Accident) घटना सातत्याने वाढत चालल्या आहेत. शिरवळ येथे बुधवारी रात्री मालट्रक आणि आयशर टेम्पोचा भीषण अपघात झाला. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला आयशर टेम्पोची जोरदार धडक बसली. ही धडक इतकी जोरदार होती की टेम्पोत बसलेले तिघेजण जागीच ठार झाल्याची माहिती मिळत आहे. या अपघातात गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.

CM शिंदेंच्या मदतीला केसरकर; एकाच शब्दांत सांगितला व्हायरल व्हिडीओचा अर्थ 

याबाबत आधिक माहिती अशी, साताऱ्याहून पुण्याकडे जात असलेला मालट्रकचे टायर पंक्चर झाले होते. त्यामुळे हा ट्रक शिरवळमधील हायवेवर उभा होता. यानंतर गाडीचे चाक बसवून झाल्यानंतर क्षणार्धात आयशर टेम्पोने भरधाव वेगात येऊन ट्रकला धडक दिली. या अपघातात (Accident) आयशर टेम्पोत बसलेले तिघे जण जागीच ठार झाले. या अपघातानंतर पुण्याकडे जाणारी वाहतूक जवळपास तासभर खोळंबली होती. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यात मदत केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी मदतकार्य सुरू केले आहे.

सध्या रस्ते अपघातांची (Accident) संख्या वाढली आहे. दरवर्षी देशभरात हजारो लोक अपघातात मरण पावतात. भरधाव वेगात वाहन चालविणे आणि वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करणे हे रस्ते अपघातांचे मुख्य कारण आहे. रस्ते अपघात कमी करण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न केले जात असले तरी अपघातांची संख्या मात्र कमी झालेली नाही.

भीषण अपघात! ट्रकची बसला जोरदार धडक; 11 प्रवासी ठार, 20 जखमी

Tags

follow us

वेब स्टोरीज