भीषण अपघात! ट्रकची बसला जोरदार धडक; 11 प्रवासी ठार, 20 जखमी

भीषण अपघात! ट्रकची बसला जोरदार धडक; 11 प्रवासी ठार, 20 जखमी

Road Accident : राजस्थान राज्यातील भरतपूर जिल्ह्यात आज सकाळीच भीषण अपघात (Road Accident) झाला. या अपघातात बसमधील 11 प्रवाशांची जागीच मृत्यू झाला तर 20 प्रवासी गंभीर जखमी झाल आहेत. भरधाव वेगातील ट्रकची जोराची धडक बसल्याने हा अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी मदतकार्य सुरू केले आहे.

याबाबत आधिक माहिती अशी, प्रवाशांनी भरलेली बस गुजरातमधून मथुरेकडे (उत्तर प्रदेश) निघाली होती. गुजरात राज्यातील भावनगर येथून ही बस जयपूर, भरतपूरमार्गे उत्तर प्रदेशातील मथुरेला जात होती. जयपूर-आग्रा महामार्गावरील हंतारा पुलावर असताना बसचा ब्रेक फेल झाला. त्यानंतर बसचालकाने बस बाजूला घेत ब्रेक दुरुस्ती सुरू केली. त्यानंतर मात्र मागील बाजूने येणाऱ्या ट्रकची या बसला जोरदार धडक बसली. धडक इतकी जोरदार होती की बसमधील 11 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. बसमधील अन्य काही प्रवासी जखमी झाले आहेत. मृतांमध्ये सहा महिला आणि पाच पुरुष आहेत. अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना रुग्णवाहिकेच्या मदतीने जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

सध्या रस्ते अपघातांची संख्या वाढली आहे. दरवर्षी देशभरात हजारो लोक अपघातात मरण पावतात. भरधाव वेगात वाहन चालविणे आणि वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करणे हे रस्ते अपघातांचे मुख्य कारण आहे. रस्ते अपघात कमी करण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न केले जात असले तरी अपघातांची संख्या मात्र कमी झालेली नाही.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube