CM शिंदेंच्या मदतीला केसरकर; एकाच शब्दांत सांगितला व्हायरल व्हिडीओचा अर्थ

CM शिंदेंच्या मदतीला केसरकर; एकाच शब्दांत सांगितला व्हायरल व्हिडीओचा अर्थ

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची काही दिवसांपूर्वी सर्वपक्षीय बैठक झाली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठा गदारोळ उठला आहे. या व्हिडीओमुळे राज्य सरकार पुन्हा बॅकफूटवर ढकलले गेले. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या व्हायरल व्हीडिओवर स्पष्टीकरण दिले. त्यानंतर आज शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी या मुद्द्यावर भाष्य करत सीएम शिंदेंचा बचाव केला.

‘इंडिया’च्या नेत्यांना बाळासाहेबांच्या समाधीस्थळी का नेलं नाही?, केसरकरांचा ठाकरेंना सवाल 

मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांनी या पत्रकार परिषदेआधी बोलून मोकळं व्हायचं, त्याला अजित पवार (Ajit Pawar) होकार देताना दिसतात. तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) माईक चालू आहे, असे शिंदे यांना सांगताना दिसत होते. त्यावर केसरकर यांनी बाजू मांडली. बोलून मोकळं व्हायचं म्हणजे, आपण निर्णय (Maratha Reservation) घ्यायचा असं होतं. निर्णय घ्यायचा म्हणजे कोर्टात टिकेल असा निर्णय घ्यायचा. त्यासाठी वेळ मागितला जात आहे. याआधी फडणवीस सरकारनेच आरक्षण दिलं होतं. हे आरक्षण जवळपास 14 महिने टिकले. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारच्या काळात सरकार आरक्षणाची बाजू मांडू शकले नाही, असेही केसरकर म्हणाले.

नेमकं काय घडलं?

मराठा आरक्षणावर (Maratha Reservation) तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला मुख्यमंत्री शिंदे जे काही बोलले तो व्हिडिओ व्हायरल झाला. त्यात सीएम शिंदे म्हणतात, आपल्याला काय बोलायचं अन् निघून जायचं? बोलून मोकळं व्हायचं…. यावर अजित पवारांनी हो…येस, असा प्रतिसादही दिला. हा संवाद सुरू असतांनाच फडणवीस यांनी सीएम शिंदेच्या कानात माईक सुरू आहे, असं सांगतात. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सरकारवर टीकेची झोड उठली आहे.

 Maratha Reservation : जरांगेंच्या भेटीनंतर पुढे काय? दानवे म्हणाले, CM शिंदेंना..

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube