Maratha Reservation : जरांगेंच्या भेटीनंतर पुढे काय? दानवे म्हणाले, CM शिंदेंना..

Maratha Reservation : जरांगेंच्या भेटीनंतर पुढे काय? दानवे म्हणाले, CM शिंदेंना..

Maratha Reservation : अंबड तालुक्यातील आंतरवाली सराटी येथे मागील सतरा दिवसांपासून मनोज जरांगे पाटील उपोषणास बसले आहेत. काल केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनीही उपोषणस्थळी येत जरांगे पाटील यांची भेट घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमांना महत्वाची माहिती दिली. दानवे म्हणाले, मनोज जरांगे आणि त्यांच्या शिष्टमंडळाशी सकारात्मक चर्चा झाली आहे. या चर्चेतील मुद्द्यांवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. मंत्री दानवे यांनी काल रात्री 11 वाजता जरांगे यांची भेट घेतली. त्यांच्याबरोबर मंत्री गिरीश महाजन, आमदार नारायण कुचे हे देखील उपस्थित होते. जवळपास साडेतीन तास चर्चा झाली. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्या उपोषणाची दखल राज्य सरकारने घेतली आहे. मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी सर्वाधिक काळ चालणारे हे आंदोलन ठरले आहे. मराठा आरक्षणाबाबत सरकारने सकारात्मक पावले देखील उचलली आहेत.

पोटात एक आणि ओठात एक हा तुमचा स्वभाव, आजोबांची पूर्ण हयात…; भाजपची आदित्य ठाकरेंवर टीका

जरांगे पाटील यांच्याशी चर्चा झाल्यानंतर जे मुद्दे समोर आले आहेत. त्याअनुषंगाने चर्चा करण्यासाठी आम्ही मुंबईला जाणार आहोत. येथे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाईल, असे दानवे म्हणाले. मनोज जरांगे यांनी कधा आंदोलन मागे घ्यावे हा त्यांचा अधिकार आहे. तसेच मुख्यमंत्री कधी भेटीला येतील हा त्यांचा अधिकार असल्याचेही दानवे यांनी स्पष्ट केले.

आरक्षणाचा खेळखंडोबा मांडलाय – जरांगे पाटील

मनोज जरांगे म्हणाले, आम्ही उपोषण सोडायला तयार, पण ते सोडवायला कुणी येतच नाहीत, आरक्षणाचा जसा खेळखंडोबा मांडलाय त्यातलाच हा प्रकार. एखादा मित्र दुसऱ्या मित्राला जसं म्हणतो की ये… नुसतं ये म्हणतो. तसं हे म्हणतात की आरक्षणासाठी एक महिन्याचा वेळ द्या. पण ती वेळ नेमकी कशासाठी पाहिजे हे मात्र सांगत, नसल्याचंही मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले होते.

‘काही लोकं आतल्या गाठीचे, फक्त टोमणे मारतात’; CM शिंदेंनी ठाकरेंना डिवचलं

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मला भेटालया येणार आहेत, याबद्दलच्या बातम्या प्रसारित झाल्यानंतर मला समजलं की ते येणार आहेत. त्यामुळे मला असं कोणीही अधिकृतपणे सांगितलं नव्हतं, पण मी अशा बातम्या ऐकत असल्याचंही ते म्हणाले आहेत. तसेच मला जास्त राजकारण कळत नाही, इतकी फेकाफेकी मी बघितली नाही. राजकारणात गोम असते… हे लोक शेंगा हाणत आहेत.. तरीही मुख्यमंत्री येतील असा मला विश्वास असल्याचं मनोज जरांगे म्हणाले आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube