ShivendraRaje-UdayanRaje पुन्हा भिडले.. आता वाद टेंडरचा

सातारा : भुयारी गटार योजना सातारा नगरपालिकेच्या (Satara Municipality) गळ्यातील पांढरा हत्ती झाली आहे. पाच-सहा वर्षे झाले तरी काम पूर्ण होत नाही. प्रशासक येऊन देखील वर्ष झालंय. तरीही काम रडत चालू आहे, असा आरोप भाजप (BJP) आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendraraj Bhosale) यांनी केला आहे. पूर्वी एचटीबी प्लॉन्ट एका ठिकाणी करायचं ठरलं होतं. पण सातारा विकास […]

Untitled Design

Untitled Design

सातारा : भुयारी गटार योजना सातारा नगरपालिकेच्या (Satara Municipality) गळ्यातील पांढरा हत्ती झाली आहे. पाच-सहा वर्षे झाले तरी काम पूर्ण होत नाही. प्रशासक येऊन देखील वर्ष झालंय. तरीही काम रडत चालू आहे, असा आरोप भाजप (BJP) आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendraraj Bhosale) यांनी केला आहे.

पूर्वी एचटीबी प्लॉन्ट एका ठिकाणी करायचं ठरलं होतं. पण सातारा विकास आघाडी आणि नगरपालिकेला जागा मिळवता आली नाही. म्हणून आता शहरात ठिकठिकाणी छोटे छोटे प्लॉन्ट करायचं ठरलं असल्याचं समजल आहे, असा टोला आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी खासदार उदयनराजे भोसले यांना लागवला आहे.

प्रशासकाने यात लक्ष घालावं आणि लवकरात लवकर ही योजना कार्यान्वीत करावी. ती ठरल्याप्रमाणे झाली पाहिजे. कोणी टेंडर देताना काही केलं असेल किंवा सातारा विकास आघाडीमध्ये काही देवाणघेवाण झाली असेल तर त्याचा फटका सातारकरांना बसता कामा नये, असा इशारा आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली आहे.

हे देखील वाचा
Mumbai : धनंजय मुंडेंच्या नावाने मंत्रालयात फसवणूक, तरुणांना नोकरीचे खोटे आमिष दाखवले

भुयारी गटार योजनेसाठी जे खोदलेले रस्ते आहेत. त्याची ताबडतोब प्रशासनाने दुरुस्ती करावी. मोती बागेतील रस्त्याचे काम काही महिन्यांपासून चालू आहे. रस्त्यांवार धुळीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे लोकांना त्रास होतोय पण याकडे नगरसेवक आणि सत्तारुढ लोक प्रशासनाकडे बोट दाखवत आहेत. टेंडर निघाले की मात्र सर्व हजर असतात, असा आरोप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी केला आहे.

ज्यावेळी नगरपालिकेत कामांच्या निविदा चालू होतात. त्यावेळी सर्व नगरसेवक मला काय भेटतंय या भूमिकेने तिथं हजर असतात. लोकांच्या अडचणीचा विषय आला की प्रशासक आहे आम्ही काय करु शकत नाही असं म्हणायचं, ही दुटप्पी भूमिका शहर विकास आघाडीची आहे, असा आरोप भोसले यांनी केला आहे.

Exit mobile version