Mumbai : धनंजय मुंडेंच्या नावाने मंत्रालयात फसवणूक, तरुणांना नोकरीचे खोटे आमिष दाखवले

Mumbai  :   धनंजय मुंडेंच्या नावाने मंत्रालयात फसवणूक, तरुणांना नोकरीचे खोटे आमिष दाखवले

माजी मंत्री धनंजय मुंडे ( Dhananjay Munde )  यांच्या नावाने मंत्रालयात बोगस नोकरी भरती सुरु होती. या प्रकरणामध्ये मंत्रालयात काम करणारे कर्मचार देखील सहभागी असल्याची माहिती आहे. या बोगस काम करणाऱ्या लोकांनी तरुणांना लाखो रुपयांचा गंडा घातला आहे. या प्रकरणी यशवंत कदम यांनी गोवंडी पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.

कदम यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी  शुभम मोहिते, निखिल माळवे, नीलेश कुडतरकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या तिघांपैकी निखिल माळवेला पोलिसांनी अटक केली आहे.

गोवंडीचे यशवंत कदम हे महानगरपालिकेतून निवृत्त झाले आहेत. त्यांचा मुलगा रणजित याने व्हॉटसअ‌ॅपवर नोकर भरतीची जाहिरात पाहिली. यानंतर त्याने निखिल माळवेला संपर्क केला. निखिलने या मुलाकडून मुलाखतीसाठी 30 हजार रुपये उकळेले. निखिलने त्याचा धनंजय मुंडेंसोबतचा फोटो दाखवत तरुणांना फसवले. त्याचा मित्रांनी देखील अशाच पद्धतीने धनंजय मुंडेंसोबतचे फोटो दाखवत तरुणांना फसवण्याचे काम केले.

या तिघांनी रणजितला रत्नागिरी येथे मुलाखतीसाठी बोलावले. तिथे त्यांनी रणजितची शुभम सोबत ओळख करुन दिली. यानंतर रणजितला मंत्रालयात जॉईन होण्यासाठीचा खोट मेल पाठवला. त्यानुसार रोजी रणजित मंत्रालयात गेला. तेव्हापासून त्याचा व शुभमचा कोणताही संपर्क होऊ शकला नाही. यानंतर त्याने पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

या फसवणाऱ्या तरुणांनी अनेक तरुणांना सामाजिक न्याय विभागात लिपिक पदाचे आमिश दाखवून फसवले आहे. त्यांनी गोवंडीच्या रणजितला जवळपास 7 लाख रुपयांना फसवल्याचे समोर आले आहे. या भामट्यांनी बनावट कागदपत्रे दिली. त्यावर बनावट सही व शिक्के देखील दिले. या प्रकरणात अनेक तरुणांची फसवणूक झाल्याची शक्यता आहे.

धनंजय मुंडे यांनी या प्रकरणाची मला काहीही माहिती नाही, अशी माहिती दिली आहे. पोलिसांनी या घटनेची कसून चौकशी करावी, असे मुंडे म्हणाले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube