Download App

गल्लीपासून-दिल्लीपर्यंत 52 निवडणुका हरले, तरीही सोलापूरच्या ‘स्वामीं’चा फडणवीसांवर विश्वास

Solapur Loksabha : आगामी लोकसभा निवडणुकांचा (Loksabha Election) कार्यक्रम जाहीर झाला आहे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरु आहे. तर दुसरीकडे मतदारसंघातील उमेदवारांकडूनही तयारी करण्यात येत आहेत. अशातच सोलापूरातील व्यंकटेश स्वामी (venkatesh swamy) सोलापूर लोकसभेसाठी इच्छूक असल्याचं समोर आलं आहे. एवढंच नाहीतर भाजपकडून सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी मिळणार असल्याचाही दावा स्वामी यांनी केला आहे. स्वामी आत्तापर्यंत गल्लीपासून-दिल्लीपर्यंत 52 निवडणुका हरले, तरीही स्वामींना भाजपकडून देवेंद्र फडणवीस तिकीट देणार असल्याचा विश्वास आहे.

मला धमकावणाऱ्या अजितदादांना आता माझा आवाका समजेल; शिंदेंनी समजावूनही शिवतारे ठाम

व्यंकटेश स्वामी म्हणाले, आत्तापर्यंत मी गावापासून दिल्लीपर्यंत सर्वच निवडणूका लढलो आहे. मी एकूण 52 निवडणूका लढलो आहे, त्यामध्ये ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा, राज्यसभा या सर्व निवडणूका लढलो असून मला अनुभव आहे. जनेतच्या विकासकामांसाठी निधी कसा आणि कुठून आणायचा याबाबतही मला माहिती आहे. मी सोलापूरकरांची सर्वच कामे करण्यासाठी सक्षम असून देशातील उद्योजकांशी संपर्क करुन उद्योगधंदे आणू शकतो असंही आश्वासन व्यंकटेश स्वामी यांनी दिलं आहे.

व्यंकटेश स्वामी यांनी सोलापुर लोकसभा मतदारसंघासाठी भाजपच्या स्थानिक नेत्यांसह राज्यातील वरिष्ठ नेत्यांशी संपर्क केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढील पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री होणार असून देवेंद्र फडणवीस मला सोलापूर मतदारसंघातून नक्कीच उमेदवारी देणार असल्याचाही विश्वास व्यंकटेश स्वामी यांनी व्यक्त केला आहे.

सिक्युरिटी प्रिंटिंग इंडियामध्ये बंपर भरती सुरू, दहावी पास ते आयटीआय उमेदवार करू शकतात अर्ज

कोण आहेत व्यंकटेश स्वामी?
व्यंकटेश स्वामी हे सोलापूरमधील जळकी गावातील मठाचे मठाधिपती आहेत. मागील अनेक वर्षांपासून ते या मठाचे मठाधिपती आहेत. मागील निवडणूकीतही स्वामी यांनी सोलापूर मतदारसंघात निवडणूक लढवण्यास इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

दरम्यान, व्यंकटेश स्वामी यांनी आत्तापर्यंत गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघातूनही उमेदवारी निवडणूक लढवली होती. आत्तापर्यंत अनेकदा निवडणूकीत हरलेले व्यंकटेश स्वामी यांनी आता सोलापूर लोकसभा मतदारसंघातून इच्छा व्यक्त केलीयं. सोलापूरात भाजपचे विद्यमान खासदार आहेत. त्यांना डावलून भाजप व्यंकटेश स्वामींना उमेदवारी देणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

follow us