सोलापुरच्या सभेत मोदींचा काँग्रेसवर जोरदार प्रहार! म्हणाले, मतांसाठी एसटी, ओबीसी यांना आश्रीत ठेवल

सोलापुरच्या सभेत मोदींचा काँग्रेसवर जोरदार प्रहार! म्हणाले, मतांसाठी एसटी, ओबीसी यांना आश्रीत ठेवल

PM Modi campaign rally in Solapur : लोकसभेच्या रणसंग्रामात प्रतप्रधानांच्या सभांचा मोठा धडाका सुरू आहे. त्यातही मोदींच्या सभांचा सीलसीला महाराष्ट्रात चांगलाच वाढलाय. एका दिवसांत महाराष्ट्रात मोदींच्या तीन-तीन सभा होत आहेत. त्यामध्ये प्रत्येक सभेत मोदींनी काँग्रेसवर जोरदार हमला केला आहे. आज सोलापूर येथे महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचार सभेत बोलताना त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला केला. काँग्रेसच्या काळात आदिवासी, दलीत, ओबीसी यांचे अधिकार कमी करण्याचं काम झालं. कारण हे लोक आपल्याला मतदान करत राहावेत यासाठी काँग्रेसने त्यांना अश्रीत ठेवलं असा थेट आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी केला आहे.

 

आपल्या भाषेत शिकून डॉक्टर इंजीनिअर करणार

आम्ही कुणाचाच अधिकार काढून न घेता सामान्य वर्गातील गरिब लोकांना न्याय देण्याचं काम केलं. तसंच, यातील सामान्य वर्गाला आम्ही 10 टक्के आरक्षण दिलं. त्यानंतर कुठंच पुतळे जाळले, काही आंदोलन झाले असं काही घडल नाही तर सर्वांनी स्वागत केलं. तसंच, समाजात भेद निर्माण नाही तर समाजाला जोडण्याचा आमचा सामाजिक व्यवहार आहे असंही मोदी यावेळी म्हणाले. तसंच, आपल्याला या गोष्टी मजाक वाटतील. परंतु, गरीब घरातील मुलांना आम्हाला डॉक्टर, इंजीनिअर बनवायचं आहे. कारण आज गरीब लोकांना डॉक्टर, इंजीनिअर होण अवघड आहे. परंतु, आपण आपल्या भाषेत शिकून डॉक्टर इंजिनीअर व्हावं हे आमचं स्वप्न आहे असा दावाही मोदींनी यावेळी केला.

 

10 वर्षात आम्ही घर दिलं

यावेळी बोलतना मोदी म्हणाले, काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकर, बाबु जगजीवन राम यांचा कायम अपमान केला. तसंच, ओबीसी दलीत नेतृत्व काँग्रेसने पुढे येऊ दिलं नाही असा घणाघाती आरोपही केला. तसंच, आज लोकसभा, राज्यसभा या सभागृहात ओबीसी, एसटी, एनटी यातील सर्व लोक नेतृत्व करत आहेत असा दावाही त्यांनी यावेळी केला. तसंच, काँग्रेसने एससी, एसटी, दलित यांच्यासोबत विश्वासघात केला असा आरोपही मोदींनी यावेळी केला. तसंच, आज गावा-गावात अडीअडचणीत कुणाला राहव लागत तर ते दलित आदीवासी ओबीसी या समाजाला राहवं लागतं आहे असंही मोदी यावेळी म्हणाले. तसंच, यांना 10 वर्षात आम्ही घर दिले असंही मोदी यावेळी म्हणाले.

 

म्हणून मोदींना मजबूत करा

आता विरोधकांनी मोदी सरकार आरक्षण संपवतील, संविधान बदलतील, असा प्रचार सुरू केला आहे. परंतु, आज बाबासाहेब आंबेडकर हे आले तरी ते आरक्षण संपवू शकत नाहीत. मोदींचा तर प्रश्नच येत नाही असा दावा मोदींनी केला आहे. आमच्या विचारात काही खोट होती तर आज जे सोबत मत आहे ते सोबत नसते असं म्हणत मी कर्ज मिटवण्याच काम करत आहे. जास्तीत जास्त जागा यासाठी पाहिजेत की, काँग्रेस ओबीसी एसटी दलीत यांचं आरक्षण मुस्लिंना देऊ पाहत आहे. कारण यांनी कर्नाटकमध्ये मिस्लिम समाजाला आरक्षण दिलं आहे. ते देशात होऊ द्यायच नाही म्हणून मोदींना मजबूत करा असंही मोदी यावेळी म्हणाले आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube