Download App

सोलापुरात ट्विस्ट! अमोल कोल्हेंनी घेतली मोहिते पाटलांची भेट, म्हणाले, ‘ये तो ट्रेलर है..,’

Image Credit: Letsupp

Amol Kolhe & Dhairyasheel Mohite Patil Meeting : सोलापुरातून एक मोठा ट्विस्ट समोर आला आहे. शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी भाजपचे नेते धैर्यशील मोहिते पाटलांची (Dhairyasheel Mohite Patil) भेट घेतली आहे. दरम्यान, सोलापुरातील माढा मतदारसंघातून महायुतीकडून रणजितसिंह नाईक यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. त्यानंतर आज कोल्हे यांनी सोलापुरात एका विवाह सोहळ्याला उपस्थिती दाखवल्यानंतर थेट मोहिते पाटलांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर ये तो ट्रेलर है…पिक्चर अभी बाकी है , असं विधान करीत संकेतच दिले आहेत. कोल्हे आणि मोहिते पाटलांच्या भेटीची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरु आहे.

सुखी संसारासाठी तावून सुलाखून जाणाऱ्या जोडप्याची कथा; ‘सुख कळले’ रसिकांच्या भेटीला

अमोल कोल्हे म्हणाले, धैर्यशील मोहिते पाटलांनी तुतारी हाती घ्यावी, अशी सर्वसामान्य कार्यकर्त्यांची इच्छा आहे. मोहिते पाटील हे राज्याचे उपमुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. 2014 सालानंतर मोहिते कुटुंबातून निवडणूक लढवलेली नाही. धैर्यशील पाटील यांनी निवडणूक लढवावी अशी अनेकांची भावना आहे. मी त्यांची भेट घेतली असून चर्चा देखील केली आहे. धैर्यशील मोहिते हाती तुतारी घेतील की नाही हे आता पुढील काळातच स्पष्ट होणार आहे. येणाऱ्या काळात सर्वच गोष्टींचा उलगडा होणार असल्याचं अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केलं आहे.

‘विकासकामे सोडून अभिनयालाच महत्व द्यायचे’; अजितदादांनी कोल्हेंना धू-धू धुतलं!

रणजितसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मोहिते पाटलांनी कार्यकर्त्यांच्या आणि काही महत्त्वाच्या नेत्यांच्या बैठकादेखील घेतल्या होत्या. रणजितसिंह यांच्या उमेदवारीला अजित पवार गटाचे नेते रामराजे निंबाळकर यांचाही विरोध आहे. त्यांनी स्पष्टपणे आपली भूमिका मांडली आहे. या सर्व घडामोडींदरम्यान भाजप नेते गिरीश महाजन हे धैर्यशील मोहिते पाटील यांची समजूत काढण्यासाठी गेल्या आठवड्यात अकलूज येथे दाखल झाले होते.

सुप्रियाताईंच्या समर्थनात अजितदादांच्या भावजयी मैदानात; ‘माहेरवाशीण’वरुन सडेतोड उत्तर

गिरीश महाजन मोहिते पाटलांच्या शिवरत्न बंगल्यावर त्यांच्या भेटीसाठी गेले होते. यावेळी मोहिते पाटलांच्या समर्थकांनी गिरीश महाजन यांच्यासमोर जोरदार घोषणाबाजी केली होती. यावेळी गिरीश महाजन यांनी मोहिते पाटील यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण मोहिते पाटील ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाहीत.

दरम्यान, संघर्षाच्या काळात शरद पवार गट धडाडीने महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढतायेत. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची तुतारी हाती असावी, अशी भावना मी अकलूज मध्ये आल्यानंतर कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली. त्यामुळे आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत”, असंही अमोल कोल्हे यावेळी म्हणाले.

follow us

वेब स्टोरीज