सुप्रियाताईंच्या समर्थनात अजितदादांच्या भावजयी मैदानात; ‘माहेरवाशीण’वरुन सडेतोड उत्तर

सुप्रियाताईंच्या समर्थनात अजितदादांच्या भावजयी मैदानात; ‘माहेरवाशीण’वरुन सडेतोड उत्तर

Sharmila Pawar News : लेकीने लग्न केल्यावर तिने कधी माहेरी यायचं नाही का? असा रोखठोक सवाल उपस्थित करीत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या सख्ख्या भावजयी शर्मिला पवार खासदार सुप्रिया सुळे (Surpriya Sule) यांच्या समर्थनात मैदानात उतरल्या आहेत. दरम्यान, बारामती लोकसभा मतदारसंघात (Baramati Loksabha) अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे अशी चुरशीची लढत होणार आहे. महायुतीकडून सुनेत्रा पवार तर महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे मैदानात उभे राहणार आहेत. बारामतीचं वातावरण तापलेलं असताना अजित पवार गटाकडून सुप्रिया सुळेंवर माहेरवाशीणवरुन टीका केली जात होती. या टीकेला अजितदादांच्या भावजयी शर्मिला पवार यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. बारामतीमध्ये आयोजित सभेसाठी पवार आल्या होत्या.

फडणवीसांनी एका दिवसात सेट केलं पाच जागांवरचं राजकारण… CM शिंदे अन् अजितदादाही खूश

शर्मिला पवार म्हणाल्या, रुपाली चाकणकर अतिशय समजूतदार आणि सुशिक्षित महिला आहे. त्यांच्याकडून अशी विधाने केली जाणे हे चुकीचं आहे. एखाद्या लेकीने लग्न केल्यानंतर तिने माहेरी यायचं नाही असं आहे का? मलाही एक मुलगी आहे, तिच्यासाठी माझ्या घराचे दरवाजे कधीही उघडेच असतील,तसेच सुप्रिया सुळेंसाठीही बारामतीचे दरवाजे उघडेच राहणार असल्याचं शर्मिला पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

तसेच आम्ही कोणाच्या विरोधात नाही. शरद पवारांना साथ देण्यासाठी मैदानात उतरलोयं. भारतीय संस्कृतीत नणंदेचा मान सन्मान ठेवला पाहिजे. तिच्या सासरचे लोकं आज पाहत असतील की बारामतीकर ताईंना विजयी करतील की नाही. माहेरवाशीण लेकीचा मान सन्मान ठेऊनच सासरी पाठवलं पाहिजे त्यांचा आवाज पुन्हा एकदा संसदेत वाजला पाहिजे, या शब्दांत शर्मिला पवार यांनी विरोधकांना सुनावलं आहे.

ही निवडणूक दोन मुदद्या्वर लढली जाणार असून एक म्हणजे भावनिक आणि दुसरी म्हणजे विकासाच्या मुद्द्यावर. भावनिक तर आहेच घरातली लेक आहे सुप्रियाताई. दुसरा मुद्दा विकासाचा आहे, बारामतीत फिरते तेव्हा तिथले लोकं मला सांगतात की एवढी कामे झाली आहे. शरद पवार, सुप्रियाताईंनी एवढे कामे केली आहेत. त्याचा कधी गवगवा केलेला नाही. बारामती मतदारसंघातील विविध तालुक्यात सुप्रियाताईंनी कामे केली आहे पण त्याचा बाहेर येऊन गवगवा केलेला नाही. बोलणाऱ्याची अंबाडी विकली जाते न बोलणाऱ्याचं सोनही विकलं जात नाही, असंही पवार म्हणाल्या आहेत.

पृवार कुटुंबात फुट नाहीच..
पवार कुटुंबात फुट नाही आम्ही पडू देणार नाही कोणीही असा विचार करु नये. रक्ताची नाती तुटत नसतात भाऊ एकत्र होतीलच . राजकारणात कधी-कधी अशी समीकरण येतात काही लोकांना कधी कधी वेगळे निर्णय घ्यावे लागतात मग ते योग्य की अयोग्य हे ज्याने त्याने ठरवावे. राजकारण आहे हे इथं कोणत्याही पक्षाच्ं नाव मी नाही घेत बाहेरचे लोकं आपल्यात फूट पाडणारच आपण ठरवायंच पडू द्यायची की नाही. असंही पवार म्हणाल्या आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube