ठाकरेंची साथ कधीच सोडणार नाही म्हणणाऱ्या ओमराजेंची शेवटची सही?; वाचा, लेट्सअप खबरबातचा खास रिपोर्ट

दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी पक्षाची बैठक बोलावली तेव्हा, ओमराजे आपला मुलगा आजारी असल्याने बैठकीला हजर नव्हते. आणि त्यांचं कारणही खर होत.

News Photo   2026 06 17T132139.186

ठाकरेंची साथ कधीच सोडणार नाही म्हणणाऱ्या ओमराजेंची शेवटची सही?; वाचा, लेट्सअप खबरबातचा खास रिपोर्ट

उद्धव ठाकरे यांची शिवसेना फुटणार, ऑपरेशन टायगर होणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपूसन होती. परंतु, जे खासदार फुटणार आहेत त्यांच्यामध्ये एक नाव कधीच असणार नाही अशी कायम चर्चा होती. (Shivsena) परंतु तसं घडलं नाही. हे नाव आहे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर. ओमराजे तुम्ही कुणासोबत आहात असा प्रश्न विचारला तर ओमराजे यांनी झोपेतही उत्तर दिलं असतं. शिवसेनेच खासदार का फुटत नव्हते तर ओमराजे सही करत नव्हते म्हणून हा सहाचा आकडा जमत नव्हता. परंतु, आता शेवटची सही ओमराजे निंबाळकर यांचीच आहे अशी माहिती देत लेट्सअप मराठीचे संपादक योगेश कुटे यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार फुटीवर आणि त्यातही प्रामुख्याने ओमराजे निंबाळकर यांच्यावर भाष्य केलं आहे.

आमदार कैलास पाटील यांनाही आमदार फुटले तेव्हा मोठी ऑफर होती. परंतु ते सुरतवरून वापस आले होते. त्यांना मागं आणण्यामध्ये ओमराजे निंबाळकर यांची महत्वाची भूमिका होती. तेव्हाच हे दोघ कधीच उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार नाहीत असं मानलं जात होतं. तोच त्यांचा युएसपी होता. तेच त्यांचं वैशिष्ट्य होतं. आता पुढे जी माहिती मिळाली आहे त्यामध्ये धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक आणि तानाजी सावंत यांनी ओमराजे निंबाळकर यांचं मन ओळवण्यात महत्वाची भूमिका बजावली असल्याचं बोललं जात आहे. त्यांना असं वाटत की, ओमराजे आले तर कैलास पाटील, उमरग्याचे आमदार स्वामी येऊ शकतात जेणेकरून जिल्ह्यात पक्षाची ताकत वाढेल.

त्याचबरोबर तानाजी सांवत यांना वाटतं की, या ऑपरेशनमध्ये आपली मदत झाली तर आपल्याला पालकमंत्रीपद मिळवून देण्यासाठी ओमराजे, कैलास पाटील मदत करतील. त्यामुळं या बंडात सरनाईक यांच्यासोबत तानाजी सावंत यांची भूमिका महत्वाची राहिली आहे. आता ओमराजे यांच्यावर ही पक्षांतरीची वेळ का आली? असा प्रश्न विचारला जात आहे. दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी पक्षाची बैठक बोलावली तेव्हा, ओमराजे आपला मुलगा आजारी असल्याने बैठकीला हजर नव्हते. आणि त्यांचं कारणही खर होत. त्यामुळं लोकांना वाटलं ओमराजे काही ठाकरेंची साथ सोडणार नाहीत.पण त्यांच्या मनात काही खदखद होती का? त्यांची काय अडचण होती? असं बोललं जात होत की ओमराजे ज्या पद्धतीने ठाकरे सेनेचा किल्ला मराठवाड्यात लढवत होते त्या पातळीवर पक्षाचं त्यांना पाठबळ मिळत नव्हत.

मोठी बातमी : ठाकरेंना दिल्लीत मोठा दणका; 6 खासदारांच्या स्वतंत्र गटाला ओम बिर्लांची मंजुरी?

निवडणुका मोठ्या खर्चिक झाल्या आहेत. त्या प्रकारची आर्थिक ताकत आपल्याकडं नाही. ती ताकत पक्षानं दिली पाहिजे अशी ओमराजेंची इच्छा होती. दुसरीकडं पक्षांतरासाठी जे काही अमिष मिळतय, जी ऑफर मिळतीये ते पाहून कोणत्याही खासादाराच्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही. परभणीचे खासदार संजय जाधव जे कधीही शिवसेना सोडणार नाहीत असं वाटत होत. पण त्या जाधव यांनी ओमराजे यांच्यासारख्या पाचजणांचं मन ओळवलं. जाधव यांनी परभणीची महानगरपालिका जिंकून आणली. पण पक्षाने म्हणावं असं कौतूक केलं नाही. म्हणजे ज्या पद्धतीची ताकत पाहिजे ती पक्षाकडून मिळत नाही असं ओमराजे आणि संजय जाधव यांना वाटत. दोघांचही दु:ख सेम आहे. ज्या पद्धतीचं अमिष शिंदे यांनी दाखवलं ते जाधव यांना सोडता आलं नाही. आजपर्यंत परभणीचे जेव्हडे शिवसेनेचे खासदार झाले त्यांनी सगळ्यांनी पुढं शिवसेना सोडलेली आहे. जाधव अपवाद होते, तोही अपवाद संपला.

यामध्ये वैशिष्ट्य वाटत ते राजाभाऊ वाजे यांचं. त्यांना तब्बल 50 कोटींची ऑफर होती अशी माहिती आहे. मात्र, या ऑफरपासून ते दूर राहिले. आणखी दोन खासदार म्हणजे, अरविंद सावंत, अनिल देसाई. या तीन खासदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ न सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पण प्रश्न पडतो तो एकाथ शिंदे किंवा भाजप इतकी फोडाफोडी का करत आहेत?  ओमराजे निंबाळकर यांच्यासारखे निष्ठावंत आपल्या कपाळावर गद्दारीचा शिक्का का लावून घेत आहेत? या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही. निंबाळकर यांच्या फेसबुक पोस्टखालील कॉमेंट पाहिल्या तर सर्वाधिक टीकात्मक कॉमेंट आहेत. आजपर्यंत त्यांच्याबद्दल राज्यभरात कौतूकाची चर्चा असायची. परंतु, ज्याक्षणी त्यांनी बाजू बदलली त्याक्षणी त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. असं बोललं जातय की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट झाल्यानंतरच ओमराजे या पक्षांतरासाठी तयार झाले आहेत. आता जे काही घडलं आहे त्याचं उत्तर पुढे मिळेलच. पण त्यांच्या कपाळावर लागलेल्या गद्दारीच्या शिक्क्याचं दु:ख त्यांना सहन करत राहवं लागेल अशी मांडणी योगेश कुटे यांनी आपल्या विश्लेशनात केली आहे.

Exit mobile version