Download App

ब्रेकिंग न्यूज: मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयाला मोठी आग, कशाने लागली आग ?

  • Written By: Last Updated:

BJP Mumbai Office Fire : राज्यात लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha Election) जोरदार प्रचार सुरू असताना मुंबईत एक मोठी दुर्घटना घडली आहे. मुंबईतील नरिमन पॉंईड भागात भाजपच्या प्रदेश कार्यालय (BJP Mumbai Office) आहे. या कार्यालयाला मोठी आग लागली आहे. ही आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाकडून प्रयत्न सुरू आहेत.

या कार्यालयातून संघटनेचे काम सुरू आहे. रविवारी या कार्यालयाचे डागडुजीचे काम सुरू होते. त्यावेळी शॉर्टसर्किट होऊ आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. आग लागलेल्या परिसरात धुराचे लोट पसरले आहेत. आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

खडसेंच्या भाजप प्रवेशासह गिरीश महाजनांद्दल पवारांच मोठ विधान, म्हणाले मी बोललो तर…>


मोठा अनर्थ टळला

भाजपच्या (BJP) प्रदेश कार्यालयात कागदपत्रे व लाकडी साहित्य होती. त्यामुळे आग वाढली आहेत. या कार्यालयात नेहमीच नेते, कार्यकर्त्यांची गर्दी असते. परंतु रविवारी होता. तसेच राज्यातील इतर भागात लोकसभेच्या प्रचार सुरू आहे. त्यामुळे भाजप नेते हे दुसऱ्या भागात होते. तर रविवार असल्यामुळे गर्दी नव्हती. सोशल मीडियाचे कर्मचारी हे कार्यालयात होते. परंतु हे कर्मचारी तत्काळ कार्यालयातून बाहेर पडले.


वंचितला धक्का! आंबेडकरांचे आदेश धुडकावत जिल्हाध्यक्ष महाविकास आघाडीसोबत


नार्वेकर, प्रसाद लाड घटनास्थळी

ही माहिती मिळाल्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर व आमदार प्रसाद लाड हे तातडीने कार्यालयाजवळ दाखल झाले. त्यांनी कार्यालयाची पाहणी केली आहे. ही आग मुख्य कार्यालयाला नसून, कार्यालयाच्या मागच्या बाजूला लागली आहे. त्यात फार नुकसान झालेले नसल्याची माहिती लाड यांनी दिलीय.

follow us