बारसू रिफायनरीवरुन सुरु असलेल्या आंदोलकांना पोलिसांकडून मारहाण झाली नसल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत विरोधकांकडून होत असलेल्या आरोपांवर भाष्य केलंय.
ठाण्यात मनपाची दुटप्पी कारवाई…सत्ताधाऱ्यांना सूट तर विरोधकांचे बॅनर उतरवले
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ज्या ठिकाणी रिफायनरी प्रकल्पाच्या मुद्द्यावरुन लोकांचं आंदोलन सुरु आहे. त्या ठिकाणा आता शांतात आहे. पोलिस आणि आंदोलक शेतकऱ्यांमध्ये चर्चा झाली असून आता शांतता असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
तसेच आंदोलन करणारे शेतकरी भूमिपुत्र असून त्यांच्यावर अन्याय करुन हा प्रकल्प पुढे न्यायचा नाही. शेतकऱ्यांवर अन्याय जबरदस्तीचं कोणतंही काम होणार नसून यासंदर्भातील माहिती आम्ही आंदोलक शेतकऱ्यांशी बैठक घेऊन चर्चा करणार आहोत. आंदोलन करणाऱ्यामध्ये काही लोकं रत्नागिरीचे तर काही लोकं बाहेरुन आले असल्याचा आरोप मुख्यमंत्री शिंदे यांनी केला आहे.
एकनाथ शिंदेना मोठा धक्का; शिवसेनेची संपत्ती ठाकरेंकडेच राहणार
तसेच रिफायनरी प्रकल्पाच्या मुद्द्यावर उद्योगमंत्री उदय सामंत स्वत: जातीने लक्ष घालून आहेत. आंदोलकांचा असा विरोध बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्यादरम्यानही झाला होता. मात्र, आम्ही लोकांना याचा फायदा समजून सांगितल्यानंतर लोकं पुढे आले होते. रिफायनरी प्रकल्पाबाबतही असंच होणार असल्याचं भाकीत त्यांनी केलं आहे.
बदला घेण्याची, सूड घेण्याची, खुनशी वृत्ती…; मुख्यमंत्री शिंदे यांचा ठाकरेंवर हल्लाबोल
यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांवरही सडकून टीका केली असून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यात व्हावा, अशी मागणी पत्राद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली होती. त्याच्याचं संमतीने हा प्रकल्प रत्नागिरीत करण्याचं ठरलं, ते आता विरोध करीत आहे. मुख्यमंत्रिपद गेलं म्हणून तुम्ही विरोध का करता? असा सवालही त्यांनी यावेळी केला आहे.
दरम्यान, माझं यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणं झालं असून आंदोलनाच्या ठिकाणी पोलिसांकडून कोणताही लाठीचार्ज झाला नसून विरोधकांनी राजकारणासाठी राजकारण करु नका, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.