एकनाथ शिंदेना मोठा धक्का; शिवसेनेची संपत्ती ठाकरेंकडेच राहणार
Supreme Court on Shivsena property issue : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे. सुप्रीम कोर्टाने शिवसेनेची मालमत्ता उद्धव ठाकरेंकडून एकनाथ शिंदेंना द्यावी ही याचिका फेटाळून लावली आहे. ॲड आशिष गिरी यांनी ही याचिका केली होती. कोर्टाने याचिकाकर्त्यांना विचारणा केली की, “तुमचा या केसशी काय संबंध”, असे म्हणत ही याचिका फेटाळली आहे. शिवसेनेच्या नावावरील मालमत्ता आणि बॅंक खाते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे वर्ग करण्याची विनंती या याचिकेद्वारी करण्यात आली होती.
एकनाथ शिंदे यांनी शिवसनेच्या 40 आमदारांसह भाजपसोबत सरकार स्थापन केल्यानंतर ठाकरे गट व शिंदे गट यांच्यामध्ये संघर्ष सुरु झाला आहे. यानंतर शिवसेना कोणाची असा देखील प्रश्न उपस्थित केला जात होता. या दोन्ही गटाकडून शिवसेना आमचीच हा दावा केला जात होता. या विषयावर निवडणुक आयोगाने आपला निकाल दिला आहे.
Adv Ashish Giri: There is an SLP before this court.
CJI DY Chandrachud: That's an SLP by Shivsena challenging the symbol's order. Who are you to file this? We can't pass such orders. Dismissed.#SupremeCourt #SupremeCourtofIndia #Shivsena
— Live Law (@LiveLawIndia) April 28, 2023
#SupremeCourt to hear plea filed by Mumbai based lawyer Ashish Giri seeking transfer of all movable & immovable properly belonging to #UddhavThackeray-led Shiv Sena (UBT) to #Shinde faction.#SupremeCourt #SupremeCourtofIndia #Shivsena pic.twitter.com/WrkHYmScT9
— Live Law (@LiveLawIndia) April 28, 2023
निवडणुक आयोगाने धनुष्यबाण व शिवसेना हे नाव शिंदे गटाला दिले आहे. यानंतर ॲड आशिष गिरी शिवसेनेच्या नावावरील मालमत्ता आणि बॅंक खाते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे वर्ग करण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयात केली होती. या त्यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना फटकारले आहे. “तुमचा या केसशी काय संबंध”, असे म्हणत ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे उद्धव ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाल्याचे बोलले जात आहे. पण यानंतर देखील शिंदे गटाकडून अधिकृतपणे कोणीतरी या संदर्भातील याचिका करु शकते. दरम्यान, या याचिकेवर मुख्यमंत्री शिंदे यांनी आम्हाला संपत्ती नको आहे, आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन चालले आहोत, असे मागे म्हटले होते.