Chief Minister Eknath Shinde : दहा ते पंधरा पर्षापूर्वी 3 हजार कोटी रुपये खर्च करून रस्त्याचं काँक्रेटीकरण करायला कुणी थांबवल होतं. हेच रस्त्यांच दुरुस्तीपेक्षा काँक्रेटीकरण झालं असत तर आज हा खर्च वाचला असता आणि अनेक लोकांचे जीव वाचले असते असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. तसंच, आम्ही काम केल्यामुळे गेल्यावर्षी मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचत होते. ते साचले नाही असा दावा करत या वर्षीही पाणी साचणार नाही असंही ते म्हणाले. दरम्यान, यांना काहीही आरोप करू द्या. त्यांनी तिजोरी साफ करण्याचं काम केलं. आम्हाला नाले सफाई करूद्या असा टोलाही शिंदे यांनी यावेळी ठाकरे यांना लगावला.
मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीबाबत मोठी अपडेट; गणेशोत्सव होईपर्यंत अवजड वाहनांना बंदी
कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही
आम्ही आता मुंबईतील अनेक ठिकाणी पाहणी करून ज्या ठिकाणी इमारती कोसळू शकतात किंवा पाऊसकाळ्यात काही धोका होऊ शकतो त्यांची व्यवस्था सरकार करणार आहे, असंही मुख्यमंत्री म्हणाले आहेत. तसंच, येथील लोकांना कुणीही वाऱ्यावर सोडणार नाही. त्यांना चांगल्या ठिकाणी ठेवण्याचं काम सरकार करणार आहे असंही ते म्हणाले. त्याचबरोबर जिथे धोकादायक नाले आहेत तिथेही काम करणार आहोत असंही शिंदे यावेळी म्हणाले.
खड्डे मुक्त मुंबई
रेल्वे स्थानकात किंवा रेल्वे स्थानकाच्या परिसरात जिथे पाणी साचते त्यावर तोडगा काढण्यासाठी सरकार लवकरच रेल्वे अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन त्यावर तोडगा काढणार आहे असंही मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले. तसंच, रस्त्यावर ज्या ठिकाणी पाणी साचत असेल त्या ठिकाणी कायमस्वरूपीचा मार्ग काढण्याचं काम करणार आहोत. त्याचबरोबर ‘खड्डे मुक्त मुंबई’ असं सरकारचं धोरण आहे. त्यामुळे येत्या दोन ते अडीच वर्षात हे काम पूर्ण होणार असंही शिंदे म्हणाले.
मुंबईच्या काळचौकी परिसरातील बीएमसीच्या शाळेत स्फोट, एकापाठोपाठ 8 सिलिंडर फुटले
नागरिकांनी सहकार्य करावं
पाऊसकाळा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर संबंधीत अधिकाऱ्यांना सुचना दिल्या आहेत. या गोष्टींची सर्व अधिकाऱ्यांनी ग्राऊंडवर जाऊन पाहणी करावी अशा सुचना दिल्याचंही शिंदे यावेळी म्हणाले आहेत. दरम्यान, हे सगळं होत असताना नागरिकांनी महापालिकेला, अधिकाऱ्यांना सहकार्य करावं असं आवाहनही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं आहे. ते एका कार्यक्रमात बोलत होते. त्यावेळी त्यांनी वरिल विषयावर भाष्य केलं.