…तर आम्ही न्यायालयात जाऊ; मतदान केंद्रावरील घटनांवरून उद्धव ठाकरे कडाडले

…तर आम्ही न्यायालयात जाऊ; मतदान केंद्रावरील घटनांवरून उद्धव ठाकरे कडाडले

Uddhav Thackeray Press Conference : देशभरात पाचव्या टप्प्यातील लोकसभेसाठी आज मतदान सुरू आहे. महाराष्ट्रात लोकसभा मतदानाचा हा शेवटचा टप्पा आहे. यामध्ये मुंबईमध्ये 6 लोकसभा मतदार संघासाठी मतदान होत आहे. त्यामध्ये तीन जागांवर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत थेट लढत होत आहे. दरम्यान, काही मतदान केंद्रावरून संथ गतीने मतदान होत आहे. तसंच, अचानक काही अडचण आली म्हणून मतदारांना वेठीस धरलं जात आहे. त्याची दखल घेत उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन कारवाईची मागणी केली आहे.

 

न्यायालयात जाऊ

पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी जाणूनबुजून काही ठिकाणी अडचणी निर्माण केल्या जात आहेत. तसंच, आमच्या लोकांना अडचणी निर्माण केल्या जात आहेत असा थेट आरोप केला आहे. तसंच, याबाबत योग्य ती खबरदारी निवडणूक अधिकाऱ्यांकडून घेतली नाही तर आपण न्यायालयात जाऊ असा थेट इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. तसंच, येथून अनेक लोकांचे आपल्याला अडचण येत आहे अशा प्रकारचे फोन आपल्याला आले आहेत असंही ठाकरे यावेळी म्हणाले आहेत.

 

आपण हस्तक्षेप करणार

अशा पद्धतीने लोकांना त्रास दिला जात असेल तर मतदानासाठी आलेल्या लोकांचं उद्या सकाळी 7 वाजपर्यंत मतदान घेण्याची वेळ आली तरी घावं लागेल. अन्यथा आपण यामध्ये हस्तक्षेप करू असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. त्याचबरोबर मुंबईत मतदानाचं ढिसाळ नियोजन केलं आहे असा थेट आरोप उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केला आहे. अनेक ठिकाणी मतदान केंद्रावर मतदारांचा खोळंबा झाला असही ठाकरे म्हणाले.

 

आम्ही काही करू शकत नाही

शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करून मतदान नीट व्हावं यासाठी निवडणूक आयोगाने प्रयत्न करावेत असं म्हटलं आहे. काही ठिकाणी मतदान केंद्रावर ईव्हीएमबाबतही तक्रारी समोर आल्या आहेत. तसंच, मुंबईकर उन्हा तान्हात मतदानासाठी उतरले आहेत. मुंबईतील लोक मतदानासाठी रांगा लावत आहेत. तासन तास मतदानासाठी रांगेत आहेत. पोलिंग बुथवर सोयी सुविधा नाहीत. पाण्याची सोय नाही, पंखे नाहीत. ही जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे. आम्ही काही करू शकत नाही. प्रयत्न केला तरी गुन्हा दाखल होईल असंही ते म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube