Elvish Yadav : एल्वीश यादववर गुन्हा दखल होताच अतुल लोंढेंना आठवला CM शिंदेंचा गणपती उत्सव

मुंबई : बिग बॉस ओटीटी 2 विजेता एल्विश यादववर (Elvish Yadav) रेव्ह पार्ट्या आयोजित करण्याबरोबरच नशेसाठी विषारी सापांचे विषाचा वापराबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणानंतर आता काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढेंना (Atul Londhe) नुकत्याच CM शिंदेंच्या घरी पार पडलेला गणपती उत्सवाची आठवण झाली आहे. याबाबत त्यांनी एक्सवर एक ट्विट करत मुख्यमंत्री एखनाथ शिंदेंना […]

एल्वीश यादववर गुन्हा दखल होताच अतुल लोंढेंना आठवला CM शिंदेंचा गणपती उत्सव

Letsupp Image 2023 11 03T124257.590

मुंबई : बिग बॉस ओटीटी 2 विजेता एल्विश यादववर (Elvish Yadav) रेव्ह पार्ट्या आयोजित करण्याबरोबरच नशेसाठी विषारी सापांचे विषाचा वापराबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणानंतर आता काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढेंना (Atul Londhe) नुकत्याच CM शिंदेंच्या घरी पार पडलेला गणपती उत्सवाची आठवण झाली आहे. याबाबत त्यांनी एक्सवर एक ट्विट करत मुख्यमंत्री एखनाथ शिंदेंना (Eknath Shinde) कात्रीत पकडण्याचा प्रयत्न करत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान गुन्हेगारांसाठी पर्यटनस्थळ झाले आहे का ? असा खोचक प्रश्न उपस्थित केला आहे. या लोंढे यांनी काही फोटोदेखील शेअर केले आहेत. (Atul Londhe Tweet After FIR Againts Elvish Yadav)

Maratha Reservation : फडणवीसांचे नियोजन, CM शिंदेंचे प्रयत्न अन् जरांगेंनी साधलेले टायमिंग

एल्वीशने गणपती उत्सवात लावली होती CM शिंदेंच्या घरी हजेरी

नुकताच देशासह राज्यात मोठ्या आंनंदात गणपती उत्सव साजरा करण्यात आला. या काळात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वर्षा निवास्थानी राजकीय नेत्यांसह अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. यात प्रामुख्याने शहनाज गिल, रश्मी देसाई यांच्यासह बॉलिवूडमधील स्टार्सनी हजेरी लावली होती. यात ‘बिग बॉस OTT 2’ चा विजेता एल्विश यादवनेदेखील हजेरी लावत आरती करत शिंदेंच्या गणपतीचे आशीर्वाद घेतले होते. त्यानंतर आज एल्वीशवर दिल्लीतील नोयडामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, हीच संधी साधत काँग्रेसने ट्विट करत एकनाथ शिंदेंना कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

अतुल लोंढेंचं ट्विट नेमकं काय?

यादववर गुन्हा दाखल होताच राज्यातील विरोधी पक्षातील नेते पुढे आले असून, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान गुन्हेगारांसाठी पर्यटनस्थळ झाले आहे का ? असा प्रश्न उपस्थित करत एकनाथ शिंदे साहेबांच्या काळात विषारी सापांच्या विषाच्या रेव्ह पार्ट्या आयोजित करणा-या एल्वीस यादव सारख्या टुकार युट्युबरला विशेष आमंत्रण देऊन गणपती आरतीला बोलावल्याची आठवण करून देण्याचा प्रयत्न केला आहे.

Sunil Tatkare यांना कधी अपात्र करणार?; नार्वेकरांचा दाखला देत सुप्रिया सुळेंनी धाडलं लोकसभा अध्यक्षांना पत्र

आता नोएडा पोलिसांनी विषारी रेव्ह पार्टी आयोजित केल्याप्रकरणी एल्वीस यादव व त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हा नोंद केला असून त्यांच्याकडे जिवंत विषारी साप सापडले आहेत. यापूर्वी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना पुण्यातील कुख्यात गुंड बाबा बोडकेंचे वर्षा बंगल्यावरील फोटो आल्याची आठवणही या ट्विटमध्ये लोंढे यांनी करून देत अरे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? असा सवाल केला आहे.

Exit mobile version