Eknath Shinde On Uddhav Thackeray: मुंबईतील गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा सुरू आहे. या मेळाव्यात एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर ( Uddhav Thackeray) मोठा आरोप केला आहे. माझ्याकडे काही नाही हे म्हणतात मग तीस वर्षे मुंबई ओरबडून खाल्ली, माया जमा केली. ही माया लंडनाला गेली का कुठे गेली, असा मोठा आरोप केलाय.
विराट गर्दी ! भक्तीगड येथील दसरा मेळाव्यातील खास क्षण
व्हॅनिटी व्हॅन घेऊन फिरणारा मी नाही
एकनाथ शिंदे म्हणाले, मी पूरग्रस्तांना मदत केली म्हणून माझ्यावर टीका केली जात आहे. कपड्यांनी इस्त्री मोडू नये म्हणून व्हॅनिटी व्हॅन घेऊन फिरणारा मी नाही. वर्क फ्रॉम होम, फेसबूक लाइव्ह करणारा मी एकनाथ शिंदे नाही. फोटो दिसतोय, त्यातील साहित्य दिसत नाही. 26 साहित्य दिले आहे. तुम्ही एक तरी बिस्कूट पुडा नेला का ? तुमचे फोटो दाखवून कार्यकर्ते मदत करत होते. तेव्हा चांगले वाटत होते. फोटोग्राफर काय दिसणार ना ? फोटोच दिसणार ना. आधी मदत केली आणि मग मी गेलो. पूरग्रस्तांच्या भागामध्ये साथीचे रोग होऊ नये म्हणून स्वच्छता केली. डॉक्टर पाठविले आहे. खुद की चाहीय काजू, बदाम, पाणीत उतरले तर सर्दी खोकला, अशी टीकाही शिंदेंवर ठाकरेंवर केली. (Eknath Shinde On Uddhav Thackeray Where did the Mumbai corruption money go)
Dasara Melava : फडक्यावरचा हिरवा रंग काढा… मोदी कोण? उद्धव ठाकरे यांचं भाजपला शिवतिर्थावरून ओपन चॅलेंज
माझे हात खाली नुसते म्हणतायतः एकनाथ शिंदे
माझे हात खाली आहे. आता काही नाही. तुमच्याकडे कधी होतं. तेव्हाही नव्हतं. उद्याही देणार नाही. द्यायला दानत लागते. एकनाथ शिंदेंचे हात देणारे आहेत. ही लेना बँक नाही, देना बँक आहे. तीस वर्षांत मुंबई ओरबडून खाल्ली, ही माया लंडनला गेली की कुठे गेली ? असे एकनाथ शिंदे म्हणाले.