Download App

अभिषेक घोसाळकरांच्या हत्येचा तपास CBI कडे वर्ग, मुंबई उच्च न्यायालयाची पोलिसांना चपराक…

शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे (CBI) सोपवण्यात आला आहे. मुंबई हायकोर्टाने हा निर्णय दिला.

  • Written By: Last Updated:

Abhishek Ghosalkar : शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळक (Abhishek Ghosalkar) यांच्या हत्या प्रकरणाबाबत मोठी अपडेट समोर आली. मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना चांगलीच चपराक लगावत घोसाळकर हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे (CBI) सोपवला आहे. अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नीने दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) स्वीकारली. यावर सुनावणी करतांना न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे (Revati Mohite-Dere) आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपीठाने हे हत्या प्रकरण सीबीआयकडे देण्याचा निर्णय दिला.

Bigg Boss Marathi: ‘घोडा लावायचा नाही रे… ‘, सुरजच्या लग्नाचे घनश्यामला टेन्शन 

अभिषेक यांच्या हत्येच्या कटातील सूत्रधारांची पोलिसांकडून पाठराखण केली जात आहे. योग्य तपास करण्यात पोलीस यंत्रणा पूर्णपणे अपयशी ठरली आहे. त्यामुळे या प्रकऱणाचा तपास सीबीआय किंवा विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) सोपवण्याचे निर्देश द्या, अशी याचिका अभिषेक यांच्या पत्नी माजी नगरसेवक तेजस्वीनी घोसाळकर यांनी दाखल केली होती. या याचिकेवर आज निकाल देण्यात आला. घोसाळकर हत्या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना चांगलेच फटकारले. मुंबई पोलिसांनी तपासात दाखवलेल्या त्रुटी दखलपात्र असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

पुणे पोर्शे कार अपघातप्रकरणी आमदार सुनील टिंगरेंची चौकशी, आयुक्त अमितेश कुमार यांची कबुली… 

अभिषेक यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मुख्य आरोपींचा मागोवा घेण्याच्या दृष्टीने पोलिसांनी गांभीर्याने तपास केला नाही. त्यामुळे खरे सूत्रधार अजूनही मोकाट आहेत. असं असतांना पोलिसांनी घाईघाईत आरोपपत्र दाखल केले, अशा शब्दात न्यायालयाने पोलिसांना फटकारले आहे. यावेळी अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचे आदेशही मुंबई उच्च न्यायालयाने दिलेत.

दरम्यान, राजकीय दबावामुळे मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं तपास योग्य पद्धतीने केला नसल्याचा आरोप तेजस्वीनी घोसाळकर यांनी दाखल केलेल्या याचिकेत करण्यात आला आहे. आता या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. त्यामुळे आता या प्रकरणाच्या तपासाला वेग येणार आणि खरे आरोपी उजेडात येतील, अशी शक्यता आहे.

follow us