Jayant Patil meet Uddhav thackeray : राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे चर्चेत आलेले आहेत. जयंत पाटील व त्यांचे समर्थक आमदार हे पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या पाठीशी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला उभारी देण्यासाठी जयंत पाटील यांनाही कष्ट करावे लागणार आहेत. परंतु जयंत पाटील यांच्याबाबत अनेक उठत आहेत. जयंत पाटील हे रविवारी गृहमंत्री अमित शाह यांना पुण्यात भेटल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. परंतु खुद्द जयंत पाटील यांनीच ही चर्चा खोडून काढल्या आहेत. त्यामुळे चर्चेत आलेले जयंत पाटील हे सोमवारी सायंकाळी थेट मातोश्रीवर गेले होते. शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे यांची त्यांनी भेट घेतली आहे.( jayant patil meet uddhav thackeray about I.N.D.I.A meeting)
20 वर्षांपासून रखडलेलं काम अमितभाईंनी मार्गी लावलं : शाहंचं कौतुक करताना अजित पवार थकले नाहीत!
या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणाले, उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली आहे. येत्या ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी पार पडणाऱ्या INDIA बैठकीची पूर्वतयारी, नियोजन याबद्दल चर्चेची आवश्यकता होती. याबाबत त्यांची भेट झाली आहे. बैठकीबाबत मी काही आवश्यक गोष्टी त्यांना सांगितल्या. आमची जी अपेक्षा आहे ती व्यक्त केल्याचे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
कोविड घोटाळाप्रकरणी माजी महापौर, अतिरिक्त आयुक्तांनंतर आता BMC चे वरिष्ठ अधिकारी रडारवर
एनडीए आघाडीविरोधात लढण्यासाठी विरोधकांनी आपल्या आघाडीचे नाव इंडिया ठेवले आहे. या आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक काही दिवसांपूर्वी बंगळुरू येथे झाली आहे. या आघाडीची दुसरी बैठक मुंबई येथे होणार आहे. त्याची पूर्वतयारीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट) व शिवसेना यांची एक बैठक झालेली आहे. इंडियाच्या बैठकीच्या नियोजनाची जबाबदारी ही शिवसेनेने घेतलेली आहे. त्यादृष्टीने शिवसेनेचे नेते तयारी करत आहेत. त्याचमुळे जयंत पाटील हे आज उद्धव ठाकरे यांना भेटले आहे.