20 वर्षांपासून रखडलेलं काम अमितभाईंनी मार्गी लावलं : शाहंचं कौतुक करताना अजित पवार थकले नाहीत!

20 वर्षांपासून रखडलेलं काम अमितभाईंनी मार्गी लावलं : शाहंचं कौतुक करताना अजित पवार थकले नाहीत!

जेजुरी :  केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी मागील 20-22 वर्षांपासून रखडलेलं काम मार्गी लावलं. देशातील साखर कारखान्यांना जवळपास 15 हजार कोटी रुपयांचा इन्मक टॅक्स लागला होता. आपल्या देशात ही रक्कम साडे सात ते 9 हजार कोटी रुपये होते. हा सगळा टॅक्स माफ केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता टनाला किमान 500 रुपये भाव जास्त मिळणार आहे, अशी माहिती देत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी अमित शाह यांचं तोंड भरुन कौतुक केलं. ते जेजुरीमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रमात बोलत होते. (Union Minister for Cooperation Amit Shah waived income tax of sugar factories in Maharashtra)

अजित पवार म्हणाले, साखर कारखान्याला त्यांच्या काटकसरीमुळे, त्यांच्या नियोजनबद्ध कामामुळे, डिस्टलरी प्रकल्प,  वीज निर्मिती प्रकल्प हातामध्ये घेतल्यामुळे जर फायदा झाला आणि एफआरपीपेक्षा जर जास्त दर दिला तर इन्कम टॅक्सची नोटीस येत होती. देशातील साखर कारखान्यांना जवळपास 15 हजार कोटी रुपयांचा इन्मक टॅक्स लागला होता. आपल्या देशात ही रक्कम साडे सात ते 9 हजार कोटी रुपये होते.

विरोधी पक्षात राहून जास्त कामं मार्गी लागत नाहीत; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं

यासाठी मी अनेकदा अनेक अर्थमंत्र्यांना भेटलो. पण मार्ग निघत नव्हता. पण अमित शाह यांनी हा टॅक्स माफ केला आहे. त्यामुळे आता टनाला किमान 500 रुपये भाव जास्त देता येणार आहे. यापूर्वी जर 2850 एफआरपी असेल तर आता 3000 पेक्षा जास्त एफआरपी शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

आमचा पक्ष अन् परिवार व्यवस्थित, जयंत पाटलांबद्दल सांगायला मी मनकवडा नाही; अजितदादांची चौफेर फटकेबाजी

विरोधी पक्षात राहुन कामे मार्गी लागत नाहीत :

महाराष्ट्रामध्ये प्रश्न अनेक आहेत, विरोधी पक्षात राहून जास्त काही कामं मार्गी लागत नाहीत. मी 30 वर्षांच्या राजकीय जीवनामध्ये विरोधी तसेच सत्ताधारी पक्षात काम केले. सत्तेचा वापर हा लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी करायचा असतो, अशी आम्हाला शिकवण आहे. त्यामध्ये शाहु, फुलेंच्या महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी हे महायुतीचं सरकार कटिबद्ध आहे. देशाचा विकास होत असताना, महाराष्ट्राच्या विकासाची गाडी भरधाव वेगाने धावणार आहे. राज्याच्या विकासासाठी आवश्यक असणाऱ्या निधीची कोणतीच कमतरता आपल्याला भासणार नाही 80 हजार कोटींची कामं एकट्या महाराष्ट्रात केंद्र सरकारच्या मदतीनं सुरु असल्याचंही अजित पवार यांनी सांगितले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube