Download App

जागावाटपाचं घोंगड भिजत तरी युती-आघाडीचे मुंबईतील उमेदवार जाहीर, यांना मिळणार संधी!

Loksabha Elections 2024 : आगामी निवडणुकांच्या ( Loksabha Elections 2024 ) पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरु आहे. सर्वच पक्षांच्या जागावाटपासाठी मॅरेथॉन बैठका सुरु आहेत. त्यात महायुती असो की, महाविकास आघाडीच्या देखील बैठकांवर बैठका होऊनही जागावाटपाचं भिजत घोंगड कायम आहे. मात्र असं असलं तरी तीन उमेदवारांची उमेदवारी देखील जाहीर करण्यात आली आहे.

राष्ट्रवादीत जाण्याच्या चर्चांदरम्यान आढळराव-मोहितेंचं मनोमिलन; शिरूरमध्ये आढळरावांचा मार्ग मोकळा?

यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्याकडून बारामतीसाठी सुप्रिया सुळे तर उत्तर पश्चिम मुंबई मतदार संघातून ठाकरे गटाचा उमेदवार जाहीर करत शिंदे गटावर पहिला डाव टाकलाय. या मतदारसंघात ठाकरेंनी अमोल कीर्तीकर यांचे उमेदवारी जाहीर केली. मात्र अद्याप महाविकास आघाडीमध्ये कोणत्या पक्षाला किती मतदारसंघ मिळणार? याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. तर मुंबईतील जागांवरून ठाकरे गटाने काँग्रेसमध्ये वाद सुरू आहेत.

Kasba Peth dargah चं बांधकाम अनधिकृतच, कबुली देत दर्गाहच्या ट्रस्टचा मोठा निर्णय!

तर नुकतचं मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघांमध्ये सायन भागामध्ये षण्मुखानंद सभागृहामध्ये शिवसेनेच्या महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषाणादरम्यान शिंदे म्हणाले की, येथील उमेदवार कोण आहे? तुम्हाला माहीतच आहे तुम्हा सर्वांना राहुल शेवाळे यांना निवडून द्यायचे. त्यामुळे शिंदे यांनी दक्षिण-मध्य मतदारसंघासाठी शिवसेनेचे राहुल शेवाळे हे उमेदवार असतील हे एक प्रकारे जाहीरच केलं आहे.

तर महाविकास आघाडी प्रमाणेच महायुतीचे देखील तसेच आहे. भाजप शिवसेना आणि अजित पवार यांचे राष्ट्रवादी या तीनही पक्षातील जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. तरी देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर सभेतून महायुतीच्या पहिल्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केली आहे. महायुतीच्या जागा वाटपासाठी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपने ते अमित शहा यांनी मुंबई दौऱ्यात शिंदे फडणवीस आणि अजित पवार यांची बैठक घेतली. त्यानंतर दिल्लीमध्ये देखील जागा वाटपावर चर्चा करण्यात आली. मात्र अद्यापही महाराष्ट्रातील जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर करण्यात आलेला नाही.

follow us