Download App

अजितदादांना उपमुखमंत्रीपदाची घाई; राज्यपालांच्या सुचनेपूर्वीच शपथविधीला सुरुवात

Ajit Pawar : राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. अजितदादांसह राष्ट्रवादीच्या 8 आमदारांनीही कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्यासोबत छगन भुजबळ, दिलीप वळसे, हसन मुश्रीफ, धर्मराव अत्राम, आदिती तटकरे, अनिल पाटील, संजय बनसोड, धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान, अजित पवार यांना राष्ट्रवादीच्या 35 आमदारांचा पाठिंबा असल्याची माहिती आहे.

अजितदादांना शपथविधीची घाई?

अजित पवार यांना यावेळी शपथ घेताना कमालीची घाई झालेली दिसून आली. राज्यपाल यांच्या सुचनेपूर्वीच अजितदादा यांनी शपथविधीचे वाचन सुरु केले. यानंतर अधिकाऱ्यांनी त्यांना थांबवलं. राज्यपाल रमेश बैस यांनी सुचना केल्यानंतर पुन्हा अजित पवार यांनी शपथ वाचनाला सुरुवात केली. अजित पवार यांनी यापूर्वी अनेकदा मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे त्यांचा पूर्वानुभव लक्षात घेता त्यांना शपथ प्रक्रियेची माहिती आहे. मात्र त्यानंतर अजित पवार यांनी घाईने शपथ वाचनाला सुरुवात केल्याने त्यांना शपथविधीची घाई झाली होती का असा सवाल विचारला जात आहे.

Ajit Pawar News : अजितदादांची उपमुख्यमंत्री म्हणून पाचवी शपथ…

राज्याच्या राजकारणात आज सकाळपासूनच मोठ्या घडामोडी घडत होत्या. अजित पवार यांनी आज राष्ट्रवादीच्या समर्थक आमदार आणि जिल्हाध्यक्षांची बैठक बोलावली होती. या बैठकीला राष्ट्रवादीचे अनेक बडे नेते उपस्थित होते. यात खासदार प्रफुल पटेल, खासदार अमोल कोल्हे, खासदार सुनिल तटकरे यांच्यासह आमदार दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे असे बडे नेते उपस्थित होते.

Ajit Pawar : रोहित पवारांचा अजितदादांना चकवा! बंडाला मारली दांडी

याच बैठकीनंतर अजित पवार समर्थक आमदारांच्या पत्रासह राजभवनाकडे रवाना झाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, नरहरी झिरवळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, किरण लहमाटे, निलेश लंके, धनंजय मुंडे, रामराजे निंबाळकर, दौलत दरोडा, मकरंद पाटील, अनुल बेणके, सुनिल टिंगरे, अमोल मिटकरी, अदिती तटकरे, शेखर निकम, निलय नाईक, अशोक पवार, अनिल पाटील, सरोज अहिरे हे आमदार अजित पवार यांच्या आजच्या बैठकीला उपस्थित होते, त्यानंतर आता हे सर्व आमदार राजभवनामध्ये शपथविधीला उपस्थित होते.

Tags

follow us