Ajit Pawar : रोहित पवारांचा अजितदादांना चकवा! बंडाला मारली दांडी
राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला असून राष्ट्रवादीत अजित पवार यांनी पुन्हा एकदा बंडाचे निशाण फडकवले आहे. अजित पवार यांचा आज (2 जुलै) शपथविधी होण्याची शक्यता असून ते उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादीच्या 40 आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र घेऊन अजित पवार राजभवनाकडे रवाना झाले आहेत. अजित पवार यांच्यासोबत पक्षातील अनेक आमदार असले तरी कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार आणि त्यांचे पुतणे रोहित पवार त्यांच्याबरोबर नाहीत, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
संघटनेत पद देण्याची मागणी केल्यानंतर आज (2 जुलै) देवगिरी बंगल्यावर अजित पवार यांच्या नेतृत्वात समर्थक आमदार आणि राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांची बैठक पार पडली. याच बैठकीनंतर या चर्चांना सुरुवात झाली आहे. अजित पवार यांच्या आजच्या बैठकीला आमदार हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, किरण लहामाटे, दौलत दरोडा, अतुल बेनके, आदिती तटकरे, संग्राम जगताप हे उपस्थित होते.
NCP : अजितदादांच्या घरी खलबतं! शरद पवार म्हणाले, बैठकीची मला माहितीच नाही
दरम्यान, राज्याच्या राजकारणात जेव्हा केव्हा अजित पवार अडचणीत असतात. किंवा सत्ताधारी गटाकडून टार्गेट केले जातात त्यावेळी आमदार रोहित पवार नेहमीच त्यांच्यासाठी किल्ला लढवत असतात. तसेच ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचेही विश्वासू समजले जातात. अशा परिस्थितीत अजित पवार यांनी आज पुन्हा एकदा बंडाचे निशाण फडकवत राज्यात खळबळ उडवून दिली असताना रोहित पवार मात्र त्यांच्यासोबत नाहीत याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.
अजित पवारांसोबत असलेले आमदार :
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, नरहरी झिरवळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, किरण लहमाटे, निलेश लंके, धनंजय मुंडे, रामराजे निंबाळकर, दौलत दरोडा, मकरंद पाटील, अनुल बेणके, सुनिल टिंगरे, अमोल मिटकरी, अदिती तटकरे, शेखर निकम, निलय नाईक, अशोक पवार, अनिल पाटील, सरोज अहिरे हे आमदार अजित पवार यांच्या आजच्या बैठकीला उपस्थित होते, त्यानंतर आता हे सर्व आमदार राजभवनामध्ये शपथविधीला उपस्थित होते.
अजितदादांची शाबासकीची थाप अन्..
काही दिवसांपू्र्वी आमदार रोहित पवार यांनी कर्जत-जामखेड या मतदारसंघात विद्यार्थीनींना सायकल वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. यासाठी त्यांनी खास अजित पवार यांनीा बोलावले होते. त्यांच्याच हस्ते सायकल वाटप करण्यात आले होते. यामाध्यमातून त्यांनी मतदारसंघात जोरदार शक्तीप्रदर्शनही केले होते.
Breaking News : अजित पवारांसोबत नगर जिल्ह्याचे ‘हे’ तीन आमदार राजभवनात
आपल्या भाषणात त्यांनी शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. तर दुसरीकडे रोहित पवार यांचे कौतुकही केले होते. कर्जत-जामखेडकरांनो, तुम्ही रोहित पवारला (Rohit Pawar) आमदार करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे मी कौतुक करतो. ज्यावेळी शरद पवार (Sharad Pawar) पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर त्यांनी केलेल्या कामांपेक्षा मी आमदार बनल्यानंतर जास्त कामे केली आणि माझ्यापेक्षा जास्त कामे रोहितने त्यांच्या तीन वर्षाच्या आमदारकीच्या काळात केली, अशी कौतुकाची थाप अजितदादांनी दिली होती.