NCP : अजितदादांच्या घरी खलबतं! शरद पवार म्हणाले, बैठकीची मला माहितीच नाही
Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाबाबत जोरदार खलबतं सुरू झाली आहेत. आज राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी त्यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक बोलावली आहे. या बातमीमुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील मात्र गैरहजर आहेत. या घडामोडींवर पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांना विचारले असता त्यांनी या बैठकीबाबत मला काहीही माहिती नसल्याचे उत्तर पत्रकार परिषदेत दिले.
मोठी बातमी : अजित पवार, छगन भुजबळ वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत? शपथविधीची तारीखही ठरली!
संघटनेत पद देण्याची मागणी केल्यानंतर आज (2 जुलै) देवगिरी बंगल्यावर अजित पवार यांच्या नेतृत्वात समर्थक आमदार आणि राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांची बैठक पार पडली. याच बैठकीनंतर या चर्चांना सुरुवात झाली आहे. अजित पवार यांच्या आजच्या बैठकीला आमदार हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, किरण लहामाटे, दौलत दरोडा, अतुल बेनके, आदिती तटकरे, संग्राम जगताप हे उपस्थित होते.
शरद पवार यांना मात्र या बैठकीची माहितीच नसल्याचे समोर आले आहे. शरद पवार यांनी स्वतः पुण्यातील मोती बागेत आयोजित पत्रकार परिषदेत याचा खुलासा केला. अजित पवार यांनी बैठक बोलावली याची मला माहिती नाही असे उत्तर त्यांनी पत्रकारांना दिले.
अजित पवार आणि जयंत पाटलांचं जमत नाही, हे तुमचं मत
ते पुढे म्हणाले, अजित पवार यांनी पक्ष संघटनेत जबाबदारी देण्याची मागणी केली होती. युवकांनाही संधी द्यावी अशी त्यांची मागणी होती. त्यात त्यांची काही चूक आहे असे वाटत नाही. अजित पवार आणि जयंत पाटील यांचं जमत नाही असं तुमचं मत आहे असे त्यांनी पत्रकारांना सांगितले. हा आमचा पक्षांतर्गत निर्णय आहे. त्यामुळे यावर आता आम्ही एकत्र बसून काय तो निर्णय घेऊ, असेही पवार म्हणाले.
राष्ट्रवादी फुटली : अजितदादांचा तातडीने शपथविधी…
प्रदेशाध्यक्ष पदाबाबत आणि त्या संदर्भात ६ तारखेला बैठक बोलावली आहे. या बैठकीत संघटनात्मक बांधणी करण्यावर चर्चा करणार आहोत. संघटनेत बदल करण्याची गरज आहे का यावर विचार होणार आहे. अजित पवारांनी काही सूचना दिल्या आहेत त्या देखील विचारात घेतल्या जातील. दिल्लीला मी पण गेलो आणि जयंत पाटील पण गेले होते. ते सगळ्यांच्या समोर बोलले की त्यांना संघटनेत काम करण्याची इच्छा आहे. बैठकीत निर्णय होईल मी एकटा निर्णय घेत नाही.
राष्ट्रवादी फुटणार का, पवार म्हणाले..
पक्ष फुटू शकतो का असा प्रश्न विचारला असता पवार म्हणाले, तर असं तुम्हाला वाटतं आम्हाला नाही. चर्चा कोण घडवत आहे माहिती नाही पण आम्ही चर्चा करत नाहीत.