मोठी बातमी : अजित पवार, छगन भुजबळ वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत? शपथविधीची तारीखही ठरली!

मोठी बातमी : अजित पवार, छगन भुजबळ वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत? शपथविधीची तारीखही ठरली!

मुंबई : राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भुकंप होण्याची शक्यता आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ हे वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. अजित पवार आणि छगन भुजबळ हे भाजपसोबत जाण्याची शक्यता असून या दोघांसह शिंदे-फडणवीस सरकारचा शपथविधी येत्या 6 जुलैला होण्याची शक्यता आहे. (NCP leader Ajit Pawar and Chhagan Bhujbal may go with Bjp soon)

संघटनेत पद देण्याची मागणी केल्यानंतर आज (2 जुलै) देवगिरी बंगल्यावर अजित पवार यांच्या नेतृत्वात समर्थक आमदार आणि राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांची बैठक पार पडली. याच बैठकीनंतर या चर्चांना सुरुवात झाली आहे. अजित पवार यांच्या आजच्या बैठकीला आमदार हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, किरण लहामाटे, दौलत दरोडा, अतुल बेनके, आदिती तटकरे, संग्राम जगताप हे उपस्थित होते.

एक बाजूला मुंबई अजित पवार यांची बैठक सुरु असतानाच दुसरीकडे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांच्या भेटीसाठी पुण्यातील मोदी बागेतील निवासस्थानी येणार आहेत. शरद पवार हे दुपारी 2 ते 3 दरम्यान आपली प्रतिक्रिया देतील अशी शक्यता आहे. सुरू असलेल्या घडामोडी पाहता काहीतरी राष्ट्रवादीमध्ये मोठ्या घडामोडी किंवा राज्याच्या राजकारणा राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे.

अजित पवारांचा गट भाजपसोबत जाण्यासाठी आग्रही?

अजित पवार हे प्रदेशाध्यक्षपदासाठी शरद पवार यांच्यावर दबाव टाकत असल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे जयंत पाटील यांनी हे पद सोडण्यासाठी नकार दिल्याची चर्चा आहे. पण प्रत्यक्षात अजित पवार यांचा गट भाजपसोबत जाण्यासाठी इच्छुक आहे. त्यातूनच या साऱ्या घडामोडी घडत असल्याचे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे. त्यामुळे आगामी तीन-चार दिवसांमध्ये राज्याच्या राजकारणात पुन्हा पहाटेच्या शपथविधी सारख्या काही घडामोडी दिसू येण्याची शक्यता राजकीय वर्तुळातील वरिष्ठ नेत्यांनी बोलून दाखवली आहे. दरम्यान, या साऱ्या परिस्थितीवर अध्यक्ष शरद पवार हे काय धोरण आखणार आणि कोणता निर्णय घेणार यावरही अजित पवार यांची गणिते अवलंबून असल्याचे सांगण्यात येत आहे.

अजित पवार यांच्या बैठकीला उपस्थित आमदार –

दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, किरण लहमाटे, निलेश लंके, धनंजय मुंडे, रामराजे निंबाळकर, दौलत दरोडा, मकरंद पाटील, अनुल बेणके, सुनिल टिंगरे, अमोल मिटकरी, अदिती तटकरे, शेखर निकम, निलय नाईक, अशोक पवार, अनिल पाटील, सरोज अहिरे हे आमदार अजित पवार यांच्या आजच्या बैठकीला उपस्थित होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube