Download App

महायुतीत तणाव! गणपत गायकवाडांना उमेदवारी दिल्यास अपक्ष लढेल, महेश गायकवाडांचा इशारा

आमदार गणपत गायकवाड किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना भाजपने निवडणुकीचे तिकीट दिले तर अपक्ष म्हणून त्यांच्याविरोधात उभा राहणार

  • Written By: Last Updated:

 

Mahesh Gaikwad : शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) आणि भाजप कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांच्यात गेल्या काही काही दिवसांपासून कुरबुरी सुरू आहेत. आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण पूर्व मतदारसंघात (Kalyan East Constituency) महायुतीत तणाव वाढला आहे. विद्यमान आमदार गणपत गायकवाड किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना भाजपने (BJP) तिकीट दिल्यास अपक्ष म्हणून निवडणूक लढणार, असा इशारा खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांचे खंदे समर्थक आणि शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांनी भाजपला दिला आहे.

बच्चू कडू तिसऱ्या आघाडीतून बाहेर पडत ‘वर्षा’ वर सरेंडर होतील; राणांना पूर्ण विश्वास 

महायुती म्हणून भाजपने कल्याण पूर्वेत जरूर पक्षातील इच्छुकांना उमेदवारी द्यावी. आम्ही त्यांचे महायुतीचा धर्म म्हणून नक्की समर्थपणे काम करू. पण आमदार गणपत गायकवाड यांनी कल्याण पूर्व मतदारसंघ भकास करून ठेवला. भाजपने त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना निवडणुकीचे तिकीट दिले तर अपक्ष म्हणून त्यांच्याविरोधात उभा राहणार असल्याचं गायकवाड म्हणाले.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका, उल्हासनगर महानगरपालिकेतील काही वॉर्ड मिळून कल्याण पूर्व मतदारसंघाची निर्मिती 2008 मध्ये झाली. हा भाजपचा पारंपरिक मतदारसंघ आहे. गणपत गायकवाड या मतदारसंघातून तीन वेळा आमदार झाले आहेत. पोलीस ठाण्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांचे समर्थक महेश गायकवाड यांच्यावर गणपत गायकवाड यांनी गोळीबार केला होता. त्यामुळे आमदार गणपत गायकवाड यांना उमेदवारी मिळू नये यासाठी शिंदे गटाकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी कल्याण पूर्वे मतदारसंघ घेऊन कल्याण पश्चिम देण्याची तयारीही शिंदे गटाने दर्शवली.

दीपक साळुंखे ‘मशाली’वर सांगोला विधानसभा लढणार? शेकाप बंडखोरीच्या तयारीत… 

गणपत गायकवाड सध्या तुरूंगात..
महेश गायकवाड आणि आमदार गणपत गायकवाड यांच्यात काही गुठे जमिनीवरून वाद सुरू होता. हे प्रकरण 2 फेब्रुवारी रोजी उल्हासनगरमधील हिललाइन पोलिस ठाण्यात पोहोचले. या प्रकरणाचा चौकशीसाठी दोघेही पोलिस ठाण्यात आले होते. गणपत गायकवाड यांनी रागाच्या भरात महेश गायकवाडांवर पोलीस ठाण्यातच गोळ्या झाडल्या. या घटनेने खळबळ उडाली होती. याया गोळीबार प्रकरणात आमदार गणपत गायकवाड सध्या तुरुंगात आहेत.

दरम्यान, गणपत गायकवाड सध्या तुरुंगात आहेत, मात्र भाजपने कल्याण पूर्व विधानसभा प्रमुखपद त्यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना दिले असून त्या निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. अशातच आता महेश गायकवाड यांनी इशारा दिल्यानंतर भाजप काय भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

follow us