बच्चू कडू तिसऱ्या आघाडीतून बाहेर पडत ‘वर्षा’ वर सरेंडर होतील; राणांना पूर्ण विश्वास

बच्चू कडू तिसऱ्या आघाडीतून बाहेर पडत ‘वर्षा’ वर सरेंडर होतील; राणांना पूर्ण विश्वास

Ravi Rana On Bachhu Kadu : बच्चू कडू तिसऱ्या आघाडीतून बाहेर पडत वर्षावर सरेंडर होतील, असा विश्वास आमदार रवि राणा (Ravi Rana) यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलायं. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात वातावरण तापलं असून बच्चू कडू यांनी महायुती सोडून तिसऱ्या आघाडीसोबत गेले आहेत. यावर बोलताना रवि राणा यांनी बच्चू कडू यांच्याबद्दल भाकीत केलंय. तसेच लोकसभा निवडणुकीच्या मुद्द्यावरुन राणा यांनी बच्चू कडूंवर गंभीर आरोप केले आहेत.

‘ते’ आंदोलन म्हणजे घरचं सत्यनारायण नव्हतं; दाखल गुन्हे मागे घ्या, राज ठाकरेंची मागणी

रवि राणा म्हणाले, बच्चू कडे हे महायुतीतच होते, शिंदे गटातील आमदारांसोबत ते गुवाहाटीला गेले होते, त्यावेळी अचलपूरच्या जनतेला विचारुन गेले नव्हते. गुवाहाटीत खोक्याचं बिल झालं ते जनतेला विचारुन झालं नव्हतं. महायुतीत असताना त्यांनी मंत्रिपद भोगलंय, आजही त्यांना कॅबिनेटचा दर्जा आहे. महायुतीत असताना मंत्रिपद घेणे, खोक्याचं राजकारण करणे, भ्रष्टाचार करणे, तडजोडी करणे हे महायुतीत होते तेव्हा चालत होतं. आता बच्चू कडू तिसऱ्या आघाडीत आहेत, पण ते तिसऱ्या आघाडीतून बाहेर पडत वर्षावर सरेंडर होणार असल्याचं रवि राणा म्हणाले आहेत.

तसेच लोकसभा निवडणुकीत बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांच्याविरोधात डमी उमेदवार केला होता. या निवडणुकीदरम्यान, कडू आणि इतरांमध्ये देणं घेणं झालंय, हे संर्वांना माहिती आहे. बच्चू कडूंनी लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांना पाडायची सुपारी घेतली होती. त्यामुळे राणा यांना कोणी पाडलं हे मला वेगळं सांगण्याची गरज नसल्याचं रवि राणा यांनी स्पष्ट केलंय.

..अन्यथा नराधम आमच्या ताब्यात द्या; पिंपरी चिंचवडच्या शाळेत बदलापुरची पुनरावृत्ती, आमदार लांडगे संतापले

आम्ही पूर्ण ताकदीने काम करताना भाजपच्या कमळाच्या उमेदवाराला विरोध करणारा बच्चू कडू असून त्यांनी डमी उमेदवार उभा करुन त्यांनी नवनीत राणांना पाडलं, आता पुढील काळाच अचलपूरची जनता बच्चू कडूला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा थेट इशाराही रवि राणा यांनी बच्चू कडू यांना दिलायं.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीला अमरावतीतून नवनीत राणा यांना उमेदवारी देऊ नये, असा पवित्रा बच्चू कडू यांनी घेतला होता. बच्चू कडू यांनी विरोध दर्शवला तरीही महायुतीकडून नवनीत राणा यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे बच्चू कडू यांनी प्रहार संघटनेचा अपक्ष उमेदवार रिंगणात उतरवला होता. दिनेश बुब यांना मैदानात निवडणुकीत उभे केले होते. तर महावकास आघाडीकडून बळवंत वानखेडे यांना उमेदवारी देण्यात आली. या निवडणुकीत बच्चू कडू यांनी उमेदवार दिल्याने नवनीत राणा यांचा पराभव झाला. महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांचा विजय झाला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube