Download App

Maratha Reservation साठी सकल मराठा समाजाकडून मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात बंदची हाक; भाजपचाही पाठिंबा

  • Written By: Last Updated:

Maratha Reservation : जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी या गावामध्ये सुरू असलेल्या मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation ) आंदोलनाला काही दिवसांपूर्वी हिंसक वळण लागलं होतं. त्यावेळी 1 सप्टेंबरला पोलिसांनी या आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याने हे आंदोलन चिघळलं होतं. त्या निषेधार्थ आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यामध्ये सकल मराठा समाजाकडून बंदची हाक देण्यात आली आहे.

Maratha Reservation : लाठीमारातील आंदोलकांची प्रकृती गंभीर; मुख्यमंत्री शिंदे करणार स्व खर्चातून उपचार

मुख्यंमंत्र्यांच्या ठाण्यात बंदची हाक!

मराठा समाजाच्या या बंदला ठाण्यात उस्पुर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. त्यात मुख्यमंत्री शिंदे यांचा मतदारसंघ असलेल्या कोपरी पाचपखाडी या भागमध्ये सर्व दुकानं बंद ठेवत व्यापाऱ्यांनी देखील या बंदला प्रतिसाद दिला आहे. दरम्यान प्रवाश्यांची अडचण होऊ नये म्हणून वाहतूक मात्र काही प्रमाणात सुरू आहे. दरम्यान मराठी आंदोलकांना रिक्षा चालकांना बंद पाळण्याचे आवाहन केले आहे.

Novak Djokovic ठरला युएस ओपन चॅंम्पियनचा बादशाह; 24 व्या ग्रॅंडस्लॅमवर कोरलं नाव

भाजपचाही बंदला पाठिंबा…

महत्त्वाची गोष्ट म्हणजे या बंदला भाजपने देखील पाठिंबा दिला आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडी आणि मनसेने देखील या बंदला पाठिंबा दिला आहे. या पार्श्वभूमीवर ठाण्यामध्ये या बंदला हिंसक वळण लागू नये यासाठी प्रशासनाकडून दोन हजार पेक्षा जास्त पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सर्व बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत. शाळा सुरू असल्याने मुलांना शाळेत पोहचवायचं कसं? असा प्रश्न पालकांसमोर उभा आहे.

मात्र हा मुख्यमंत्री शिंदेंच्या ठाण्यामध्ये हा बंद पाळण्यात आला आहे. शिंदे मराठा नेते असल्याने आम्हाला आरक्षण देतील असं मराठा आंदोलकांनी बोलून दाखवलं तर हा बंद शांततेतील असेल. त्याला हिंसक वळण लागणार नाही याची काळजी घेतली जाईल. सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हा बंद पाळण्यात येणार आहे.

follow us