Download App

आताची मोठी बातमी! आझाद मैदान तीन वाजेपर्यंत रिकामं करा, जरांगेंच्या आंदोलनाला..; उच्च न्यायालयाचा अल्टिमेटम

दुपारी तीन वाजेपर्यंत मुंबई रिकामी करा. सगळं सुरळीत झालं पाहिजे अन्यथा कोर्टाचा अवमान केला म्हणून कारवाईऊ करू असा इशारा न्यायालयाने राज्य सरकारला दिला.

Manoj Jarange Mumbai High Court Hearing : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण ढवळून निघालं आहे. मुंबईतील आझाद मैदानात (Mumbai Azad Maidan) मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचं आंदोलन सुरू आहे. आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा (Maratha Reservation) दिवस आहे. या घडामोडी घडत असतानाच आज या आंदोलनासंदर्भात उच्च न्यायालायात पुन्हा सुनावणी झाली. आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला परवानगी नाही. आज, मंगळवार दुपारी तीन वाजेपर्यंत आंदोलकांना आदेशाचे पालन करायला सांगा, अन्यथा आम्हाला न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कारवाई करावी लागेल आणि मनोज जरांगे पाटील यांना जबर दंड लावण्याचाही आदेश आम्हाला द्यावा लागेल, मुंबईकरांना शांतपणे त्यांचे जनजीवन जगू द्या, असा इशारा मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.

दुपारी तीन वाजेपर्यंत मुंबई रिकामी करा. सगळं सुरळीत झालं पाहिजे अन्यथा कोर्टाचा अवमान केला म्हणून कारवाई करू असा इशारा न्यायालयाने दिला. या प्रकरणी दुपारी तीन वाजता पुन्हा सुनावणी होणार आहे. दुपारच्या सुनावणीत नेमकं काय होणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. याच सुनावणीत न्यायालयाने दुपारी 3 वाजेपर्यंत आझाद मैदान खाली करण्याचे निर्देशच आंदोलकांना दिले आहेत. तसेच, पोलिसांनाही कायद्यानुसार कारवाई करण्याचे बजावले आहे. मात्र, कुठल्याही परिस्थितीत 3 वाजेपर्यंत मैदान सोडणार नाही, अशी भूमिका आंदोलकांची दिसून येत आहे.

मुंबईतील आझाद मैदानात जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे. यासंदर्भात काल न्यायालयात सुनावणी झाली होती. यानंतर न्यायालयाने दक्षिण मुंबईतील सर्व रस्ते मोकळे करा अशा सूचना दिल्या होत्या. यानंतर आज सकाळीच राज्य सरकारने आझाद मैदान मोकळे करण्याच्या सूचना आंदोलकांना दिल्या. तसेच न्यायालयाच्या आदेशानंतर आंदोलकांनी आज मुंबईतील रस्ते मोकळे केले. या घडामोडी घडत असतानाच आज पुन्हा न्यायालयात सुनावणी पार पडली.

“मनोज जरांगे शरद पवारांचं नाव का घेत नाही, सर्वात आधी मी जरांगेंना..”, आ. लाड यांनी काय सांगितलं?

आझाद मैदान रिकामं करा अन्यथा..

आज झालेल्या सुनावणीत न्यायालयाने सध्याच्या घडामोडींवर नाराजी व्यक्त केली. राज्य सरकारलाही चांगलंच फटकारलं. केवळ पाच हजार जणांना परवानगी असताना काय काळजी घेतली, असा सवाल न्यायालयाने आंदोलकांच्या वकिलांना विचारला. आंदोलकांकडे आंदोलनाची परवानगी नाही त्यामुळे आज दुपारी 2 वाजून 40 मिनिटांपर्यंत जागा रिकामी करा. तीन वाजेपर्यंत सर्वकाही सुरळीत झालेलं आम्हाला पाहायचं आहे अन्यथा आम्ही स्वतः रस्त्यावर उतरून आढावा घेऊ असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

न्यायालयात एसीजे यांनी मराठा आंदोलकांचे वकील मानेशिंदे यांना थेट प्रश्न विचारला. उच्च न्यायालयाला वेढा घालता येणार नाही. तुम्ही प्रथम या न्यायालयाचे अधिकारी आहात. ते (मराठा आंदोलक) तिथून निघून गेले का? असे न्यायालयाने विचारले. यावर परवानगीत वाढ व्हावी यासाठी त्यांच्याकडून अर्ज करण्यात आला आहे. बाकीचे निघून गेले आहेत, असे उत्तर वकिलांनी दिले.

यावर न्यायमूर्ती म्हणाले, हे काय आहे? अर्जावर काही आदेश येईल ही अपेक्षा? तिथे कुणीही बसू शकत नाही ताबडतोब निघून जावे लागेल. आज दुपारी तीन नंतर कुणीही तिथे बसणार नाही याची खात्री करा. अन्यथा आवश्यकता वाटल्यास आम्ही तिथे एखाद्याला पाठवू किंवा आम्ही स्वतः रस्ते आणि घटनास्थळी भेट देऊ सर्वजण निघून गेले आहेत का याची तपासणी करू

मराठा आंदोलन पेटवण्याचा कट; मंत्रिमंडळातील शक्तींचा हात, संजय राऊतांचा स्फोटक आरोप

मनोज जरांगे पाटील यांनी केलेला अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे आता त्यांनी दुपारी तीन वाजेपर्यंत आझाद मैदान मोकळे करावे आम्ही आंदोलन आयोजकांना दुपारी तीन वाजेपर्यंतची वेळ देतो. आझाद मैदान मोकळे करा अन्यथा न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी कठोर कारवाई करण्यात येईल आणि भलामोठा दंडही आकारला जाईल असेही प्रभारी मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर आणि न्या. आरती साठे यांच्या खंडपीठाने बजावले.

follow us